चेन्नई, तमिळनाडू ः जोरदार पावसामुळे येथील रस्ते पाण्याखाली गेले अाहेत.
चेन्नई, तमिळनाडू ः जोरदार पावसामुळे येथील रस्ते पाण्याखाली गेले अाहेत. 
मुख्य बातम्या

ओखी चक्रीवादळामुळे केरळ, तमिळनाडूत नुकसान

वृत्तसेवा

चेन्नई, तमिळनाडू  ः ओखी चक्रीवादळाचा दक्षिण भारतातील किनारपट्टी भागाला मोठा तडाखा बसला अाहे. या वादळामुळे तमिळनाडूसह केरळमधील किनारी भागात मोठे नुकसान झाले अाहे. या वादळामुळे अातापर्यंत दोन्ही राज्यांतील ९ जणांचा मृत्यू झाला अाहे. हे चक्रीवादळ शुक्रवारी (ता. १) केरळ अाणि लक्षद्वीप बेटाच्या दिशेने सरकले. पुढील चोवीस तासांत या चक्रीवादळाची तीव्रता वाढणार अाहे, असा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला अाहे.

ओखी चक्रीवादळामुळे तमिळनाडूतील किनारी पट्ट्यात जोरदार पाऊस पडत अाहे. यामुळे कन्याकुमारी, तिरुनेलवेल्ली जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली अाहे. तसेच या भागात झाडांची पडझड झाली असून, अनेक वीज खांब कोसळले अाहेत. बंगालच्या उपसागरात बुधवारी (ता. २९) कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला होता. त्यानंतर गुरुवारी (ता. ३०) हा कमी दाबाचा पट्टा अधिकच तीव्र झाल्याने त्याचे रूपांतर चक्रीवादळात झाले.

ओखी चक्रीवादळामुळे केरळ, तमिळनाडू या राज्यांमध्ये मुसळधार पावसासह वादळी वारे वाहत आहेत. या पार्श्वभूमीवर तमिळनाडूतील चेन्नई, कांचीपुरम, दिंडीगुल, कन्याकुमारी, तुतीकोरीन, थेनी अादींसह १३ जिल्ह्यांतील शाळांना सुटी देण्यात अाली अाहे.

ओखी चक्रीवादळ अरबी समुद्रातील दक्षिणपूर्व भागात पोचले असून, ते पश्चिम-वायव्य दिशेकडे सरकत अाहे. हे सध्या लक्षद्वीपमधील मिनिकॉयपासून ११० किलोमीटरवर अाणि अमिनी दिवी बेटापासून दक्षिण पूर्व दिशेला २९० किलोमीटर अंतरावर अाहे. हे वादळ पुढील २४ तासांत लक्षद्वीपच्या दिशेने सरकणार अाहे. तसेच या वादळामुळे पुढील १२ तासांत तमिळनाडूत जोरदार पाऊस पडेल, असे हवामान विभागाने म्हटले अाहे. केरळमधील शेकडो मच्छीमार समुद्रात अडकले ओखी चक्रीवादळामुळे केरळमधील शेकडो मच्छीमार समुद्रात अडकले अाहेत. भारतीय नौदल, हवाई दल अाणि तटरक्षक दलांकडून केरळमधील किनारी भागात मच्छीमारांचा शोध सुरू अाहे. अातापर्यंत ७० मच्छीमारांशी संपर्क साधला अाहे. मच्छीमारांच्या मदतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू अाहेत, असे केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी म्हटले अाहे.

चक्रीवादळामुळे दक्षिण केरळ भागातील चार जणांचा मृत्यू झाला अाहे. येथे मोठ्या प्रमाणात झाडे कोसळली अाहेत. यामुळे वाहतूक ठप्प झाली अाहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur River Pollution : पंचगंगा जलपर्णीच्या विळख्यात, गढूळ पाण्याचा दुर्गंध, प्रदुषण नियंत्रण मंडळ करतय काय?

Village Development : शेती प्रयोगशीलता अन ग्रामविकास...

Panchayat Development Index : पंचायत विकास निर्देशांक

Vegetable Market : कडक उन्हाचा पालेभाज्यांवर परिणाम, मार्केटमध्ये आंबेच आंबे

Agriculture Import : आयातीत कसली आत्मनिर्भरता?

SCROLL FOR NEXT