now produces Molasses from neera in Malinagar 
मुख्य बातम्या

माळीनगरमध्ये आता नीरापासून गुळ उत्पादन

माळीनगर येथील नीरा उत्पादक शेतकरी निळकंठ भोंगळे आणि पृथ्वीराज भोंगळे या पिता-पुत्रांनी नीरा विक्रीला पर्याय म्हणून नीरापासून गुळ निर्मिती चालू केली आहे.

टीम अॅग्रोवन

लवंग, जि. सोलापूर : सध्या नीरा उत्पादनाचा हंगाम चालू आहे. परंतु, ‘लॉकडाऊन’मुळे नीरा उत्पादकांना नीरा विक्रीची केंद्रे बंद ठेवावी लागली आहेत. माळीनगर येथील नीरा उत्पादक शेतकरी निळकंठ भोंगळे आणि पृथ्वीराज भोंगळे या पिता-पुत्रांनी नीरा विक्रीला पर्याय म्हणून नीरापासून गुळ निर्मिती चालू केली आहे. 

महाराष्ट्रातील सर्वात पहिली आणि बागायत क्षेत्रातील सर्वात मोठी नीरा उत्पादनासाठी सिंधीच्या झाडांची भोंगळे यांची बाग आहे. भोंगळे यांनी तेरा वर्षांपूर्वी चार हजार सिंधीच्या झाडांची बागायत लागवड केली. गेल्या नऊ वर्षापासून ते नीरेचे उत्पादन घेत आहेत. नीरा काढण्यासाठी खास कलकत्ता येथून बंगाली लोकांना दरवर्षी ते येथे आणतात. नोव्हेंबर ते जूनपर्यंत नीरेच्या बागेची देखभाल आणि उत्पादनासाठी हे लोक येथे राहतात.

यंदा या उत्पादनाला सुरुवात केली आणि ‘कोरोना’मुळे लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे भोंगळे यांना नीरा विक्रीची केंद्रे बंद ठेवावी लागली. त्यामुळे ते आता नीरेपासून गूळनिर्मितीकडे वळले आहेत. यापूर्वी त्यांनी चार-पाच वर्षापूर्वी गुळ निर्मितीचा प्रयोग केला होता. हा गूळ डायबेटीस असणाऱ्यांना अतिशय चांगला असतो. आता या प्रसंगामुळे पुन्हा ते गुळाकडे वळले आहेत. 

पृथ्वीराज भोंगळे म्हणाले, ‘‘उसाच्या रसापासून केलेल्या गुळापेक्षा नीरेच्या गुळाचा ग्लायसेमिक इंडेक्स खूपच कमी असल्याने डायबेटीस लोकांना हा गुळ अत्यंत उपयुक्त व गुणकारी असतो. आम्ही शेतातच गूळ निर्मितीसाठी एक वेगळ्या प्रकारचे गुऱ्हाळ तयार केले आहे. ४ हजार झाडांमधून रोज १४० ते १५० झाडांची निरा काढतो. रोज सुमारे ५०० लिटर नीरेपासून ५० किलो गूळ तयार होतो. या तयार केलेल्या गुळाची विक्री इंदापूरसह पुणे, मुंबई, आणि नाशिक येथे करतो. तसेच ऑनलाइन गुळाची विक्रीही केली जाते. नीरा विक्री थांबली तरी, गुळ निर्मितीमुळे आमचे नुकसान झाले नाही. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Cotton Procurement: कापूस खरेदीत महाराष्ट्र पिछाडीवर

Maharashtra Cold Wave: पावसाला पोषक हवामान, हुडहुडी कमी होणार

Krushi Samruddhi Yojana: अहिल्यानगरला कृषी समृद्धी योजनेसाठी सव्वा बावीस कोटी

Rabi Season: शेतकऱ्यांना रब्बीचा आधार

Foodgrain Production: भारतानं धान्य उत्पादनात नवा इतिहास रचला, भात उत्पादन सर्वाधिक, विक्रमी वाढ

SCROLL FOR NEXT