Hawaman
Hawaman 
मुख्य बातम्या

सर्वदूर हलक्या पावसाची शक्यता 

टीम अॅग्रोवन

पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्राच्या प्रभावामुळे विदर्भात अनेक पाऊस पडत आहे. उद्या (ता.१) कोकण, विदर्भात सर्वदूर हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तर पुणे, साताऱ्याच्या घाटमाथ्यासह रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

बंगालच्या उपसागरातील ठळक कमी दाबाचे क्षेत्र पश्चिम बंगाल आणि झारखंड परिसरावर आहे. तर मध्य उत्तर प्रदेशमध्ये नव्याने कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. मॉन्सूनचा आस असलेल्या कमी दाबाचा पट्टा राज्यस्थानच्या गंगानगरपासून या दोन्ही कमी दाब क्षेत्रापर्यंत विस्तारला आहे. अरबी समुद्रात किनारपट्टीला समांतर हवेचा कमी दाबाचा पट्टा निवळून गेला आहे. 

पश्चिम बंगालमधील कमी दाबाचे क्षेत्र पश्चिमेकडे भारताकडे सरकत आहे. पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार, छत्तीसगड, मध्य प्रदेशसह उत्तर भारतात पावसाचा जोर वाढणार आहे. दरम्यान अरबी समुद्रावरून बाष्पाचा पुरवठा होत असल्याने पूर्व राजस्थान आणि पश्चिम मध्य प्रदेशमध्येही जोरदार पावसाची शक्यता आहे.  येथे होणार जोरदार पाऊस  रविवार ः संपूर्ण राज्यात तुरळक  सोमवार ः संपूर्ण राज्यात तुरळक  मंगळवार ः संपूर्ण राज्यात तुरळक  बुधवार ः संपूर्ण राज्यात तुरळक  राज्यातील प्रमुख शहरांमध्ये शनिवारी (ता.३१) सकाळी आठ वाजेपर्यंत नोंदवले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) कंसात सरासरीच्या तुलनेत झालेली वाढ : 

  • पुणे - २६.२ (-१.४) 
  • जळगाव - ३१.६ (०.३) 
  • कोल्हापूर - २४.९ (-१.५) 
  • महाबळेश्वर - १९.५ 
  • मालेगाव - ३०.८ (१.१) 
  • नाशिक - २६.३ (-१.५) 
  • सांगली - २६.५ (-१.९) 
  • सातारा - २४.७ ( -१.७) 
  • सोलापूर - ३०.४ (-०.८) 
  • मुंबई (कुलाबा) - ३०.३ (०.५) 
  • अलिबाग - २९.६ (-०.१) 
  • रत्नागिरी - २९.४ (०.९) 
  • डहाणू - ३१.३ (१.२) 
  • औरंगाबाद - २६.२ (-३.०) 
  • परभणी - २९.१ (-१.६) 
  • नांदेड- ३३.० (१.७) 
  • अकोला - ३०.९, 
  • अमरावती - २९.० (-१.२) 
  • बुलडाणा - २६.५ (-१.६) 
  • ब्रम्हपुरी - ३०.१ (-०.१) 
  • चंद्रपूर - ३०.२ (-०.९) 
  • गोंदिया - २५.० (-६.०) 
  • नागपूर - २५.६ (-५.२) 
  • वर्धा - २७.० (-३.७) 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

    APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

    Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

    Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

    Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

    SCROLL FOR NEXT