राज्यात हलक्या पावसाचा अंदाज
राज्यात हलक्या पावसाचा अंदाज 
मुख्य बातम्या

राज्यात हलक्या पावसाचा अंदाज

टीम अॅग्रोवन

पुणे: कमी दाबाचे क्षेत्र विरून गेल्यानंतर राज्यात पावसाने उघडीप दिली आहे. शनिवारपर्यंत (ता.१) कोकणात काही ठिकाणी तर उर्वरीत राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. छत्तीसगडसह पूर्व भारतामध्ये झालेल्या पावसामुळे पर्लकोटा नदीला पूर आल्याने १३० गावांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला होता.   महाराष्ट्रासह मध्य भारतामध्ये वाऱ्यांचे पूर्व पश्‍चिम जोडक्षेत्र आहे. तर माॅन्सूनचा आस राजस्थानच्या बिकानेरपासून बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. यामुळे मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशात पाऊस वाढणार असून, महाराष्ट्रसह दक्षिणेकडील राज्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. रविवारपासून (ता. २) कोकणासह मध्य महाराष्ट्र, विदर्भात पुन्हा पाऊस सुरू होण्याचा अंदाज आहे. बुधवारी सकाळपर्यंत कोकण, पूर्व विदर्भात अनेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला. उर्वरीत राज्यात मुख्यत: कोरडे हवामान होते.  बुधवारी (ता.२९) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये, स्त्रोत - कृषी विभाग) :  कोकण : शिरगांव ३२, अंबवली ३२, धामनंद ३५, देवळे ३१, तुलसानी ३७, राजापूर ३३, सवंडल ३०, कुंभवडे ३१, पाचल ४८, सातवली ४५, बांदा ३५, आजगाव ३२, अंबोली ३५, वेंगुर्ला ३२, शिरोडा ५२, फोंडा ३२, वैभववाडी ३७, येडगाव ५७, भुइबावडा ४४, भेडशी ३५.  मध्य महाराष्ट्र : मंद्रूप ३२, निंबार्गी ५८, विंचूर ४५, मंगळवेढा ३०, तापोळा ४५, लामज ६०, आंबा ४१, राधानगरी ५७, कसबा ३०, चंदगड ३८.  मराठवाडा : अंबाजोगाई २२, होळ ३४, धारूर २२.  विदर्भ : देवळापूर ३५, मोहाडी ३२, वार्थी ३५, केरडी ६७, केंद्री ४२, नाकडोंगरी ७६, तुमसर ५७, शिवरा ७५, मिटेवणी ५६, गाऱ्हा ४७, साकेली ३४, गंगाझारी ६९, रत्नारा १२२, दासगाव ११०, गोंदिया ३९, खामरी ४३, काट्टीपूर ७३, आमगाव ३९, ठाणा ४०, परसवाडा ९०, तिरोडा ५६, मुंडीकोटा ७०, वाडेगाव ५४, ठाणेगाव ६९, सौदाद ३२, दारव्हा ३०, सिरोंचा ३६, कोर्ची ३६, बेडगाव ३२, कोटगुळ ३९.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation : 'शिरसाई'चे दहा दिवसांचे उन्हाळी आवर्तन

Cotton Bales Production : खानदेशात यंदा २५ टक्के कापूसगाठी निर्मितीत घट

Paddy Procurement : भरडाई रखडल्याने २१ लाख क्‍विंटल धान गोदामातच

Water Scarcity : ‘हर घर नल से’ नाही, तर टँकरमधूनच पाणी

Banana Market : रावेरातून केळीची रेल्वेने वाहतूक सुरू

SCROLL FOR NEXT