No information was received about fruit crop insurance sanction in Nanded district
No information was received about fruit crop insurance sanction in Nanded district 
मुख्य बातम्या

नांदेड जिल्ह्यात फळपीक विमा मंजुरीची माहिती मिळेना

टीम अॅग्रोवन

नांदेड : मागील वर्षी मृग तसेच आंबिया बहरासाठी हवामान आधारित फळपीक विमा योजना जिल्ह्यातील अकरा तालुक्यांतील ३३ मंडळांत लागू केली होती. यात जिल्ह्यातील चार हजार ८८० शेतकऱ्यांनी भाग घेऊन कंपनीकडे शेतकरी व शासनाचा एकूण ४५ कोटी १४ लाखांचा विमा हप्ता भरला. यानंतर हा विमा मंजूर किंवा नामंजूर झाला याबाबत कंपनीकडून माहिती मिळत नसल्याचे कृषी विभागाने कळविले आहे. 

यामुळे शेतकऱ्यांनी डोक्याला हात लावला आहे. मागील वर्षी नांदेडमध्ये केळी, आंबा व मोसंबी या फळपिकासाठी हवामान आधारित फळपीक विमा योजना लागू केला होता. यात केळी व मोसंबीसाठी ता. ३१ ऑक्टोबर २०२० पर्यंत तर आंबा फळपिकासाठी गुरुवारपर्यंत ता. १५ नोव्हेंबर २०२० मुदत होती. यात जिल्ह्यातील अधिसूचित मंडळातील चार हजार ८८० शेतकऱ्यांनी भाग घेऊन दोन कोटी २५ लाखांचा विमा हप्ता भरला होता. तर राज्य शासनाने तीन कोटी एक लाख व केंद्र शासनाने दोन कोटी ८९ लाख असा एकूण आठ कोटी १६ लाख रुपयांचा विमा हप्ता कंपनीकडे भरला होता. यात ४५ कोटी १४ लाख ८२ हजार संरक्षित रक्कम निश्‍चित केली होती. दरम्यान, विमा मंजुरीचा कालावधी लोटूनही शेतकऱ्यांना विम्याबाबत कोणतीही माहिती दिली नसल्याने शेतकरी संभ्रमात आहेत. 

याबाबत भनगी येथील शेतकरी प्रभाकर मोरे यांनी विमा कंपनीने मागील वर्षीचा केळीचा विमा भरला होता. परंतु याबाबत कोणतीही माहिती मिळाली नसल्याने यंदा विमा कसा भरावा, असा प्रश्‍न उपस्थित केला आहे. तर कृषी विभागाकडे संपर्क केला असता आम्ही कंपनीकडे माहितीसंदर्भात मेल केला, परंतु कंपनीकडून अद्याप माहिती मिळाली नसल्याचे सांगितले आहे.

या मंडळांतील शेतकऱ्यांनी भरला फळपीक विमा जिल्ह्यात आंबिया बहरात केळीसाठी तरोडा बु., तुप्पा, वसरणी, लिंबगाव, विष्णुपुरी (ता. नांदेड). अर्धापूर, दाभड, मालेगाव (ता. अर्धापूर), मुदखेड, मुगट, बारड (ता. मुदखेड). शेवडी बा. (ता. लोहा). हदगाव, तामसा, मनाठा, आष्टी (ता. हदगाव). भोकर (ता. भोकर). मरखेल व हाणेगाव (ता. देगलूर). उमरी (ता. उमरी). बरबडा (ता. नायगाव). आंबा : कंधार (ता. कंधार). मुक्रमाबाद (ता. मुखेड). दाभड (ता. अर्धापूर) मोसंबीसाठी आंबिया बहरात मालेगाव (ता. अर्धापूर). लिंबगाव (ता. नांदेड) या तालुक्याचा समावेश होता. तर मोसंबीसाठी मृग बहारात पिंपरखेड (ता. हदगाव), जाहूर (ता. मुखेड) व लिंबगाव (ता. नांदेड) या मंडळांचा समावेश होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT