फवारणीप्रकरणी नेटिसांना अधिकाऱ्यांचे उत्तरच नाही
फवारणीप्रकरणी नेटिसांना अधिकाऱ्यांचे उत्तरच नाही 
मुख्य बातम्या

फवारणीप्रकरणी नेटिसांना अधिकाऱ्यांचे उत्तरच नाही

टीम अॅग्रोवन

यवतमाळ ः कीटकनाशकांच्या फवारणीप्रकरणी प्रशासनाला वेळेत माहिती का दिली नाही? यासाठी जिल्ह्यातील सोळा गटविकास अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नाेटिसा बजावण्यात आली होत्या. परंतु या नोटिसांना वेळेत खुलासा सादर करण्याचे सौजन्य केवळ तीन अधिकाऱ्यांनी दाखविल्याने उर्वरित अधिकाऱ्यांवर काय कारवाई होते, याकडे आता सर्वांचे लक्ष्य लागले आहे.   जिल्ह्यात किडीपासून पीक वाचविण्याच्या प्रयत्नात फवारणी करताना विषबाधा झाल्याने २२ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. त्यासोबतच ४०० पेक्षा अधिक बाधित होत त्यांच्यावर उपचार झाले. याबाबतची संपूर्ण माहिती पंचायत समित्यांना असतानादेखील त्यांनी वेळेत जिल्हा परिषद प्रशासनाला माहिती पाठविली नाही, असा ठपका ठेवत सोळा पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या.  मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक सिंगला यांनी ही नोटीस बजावली होती. त्यात तीन दिवसात खुलासा सादर करण्याचे आदेश होते. परंतु मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या या नोटिसीला १३ अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवित जिल्ह्यातील केवळ तीनच अधिकाऱ्यांनी खुलासा सादर केला आहे. दरम्यान, खुलासा न सादर करणाऱ्या गटविकास अधिकाऱ्यांवर या प्रकरणी काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT