नितीश कुमार यांचा आज शपथविधी; सातव्यांदा होणार बिहारचे मुख्यमंत्री
नितीश कुमार यांचा आज शपथविधी; सातव्यांदा होणार बिहारचे मुख्यमंत्री 
मुख्य बातम्या

नितीश कुमार यांचा आज शपथविधी; सातव्यांदा होणार बिहारचे मुख्यमंत्री

वृत्तसेवा

पाटणा ः संयुक्त जनता दलाचे नेते नितीश कुमार सातव्यांदा बिहार राज्याचा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. आज (ता.१६) सकाळी साडे अकरा वाजता त्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये निसटता विजय प्राप्त केल्यानंतर सत्ताधारी एनडीएची रविवारी (ता.१५) एक महत्त्वाची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत भाजप-जेडीयू यांच्या नेतृत्वातील ‘एनडीए’च्या मुख्य नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाली.

बैठकीत, भाजपा, जेडीयू यांच्यासहित सहकारी पक्ष हिंदुस्तानी आवाम मोर्चा आणि विकासशील इन्सान पार्टीचे आमदारदेखील उपस्थित होते. तसेच काही अपक्ष आमदारांनीही ‘एनडीए’ला समर्थन देण्याची तयारी दाखवली आहे. ‘एनडीए’ने निवडणुकीच्या आधीच नितीश कुमार यांना आपला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून घोषित केले होते. नितीश कुमार यांचा मागचा कार्यकाळ पूर्ण झाल्यावर मुख्यमंत्र्यांनी आधीच राज्यपाल फागू चौहान यांना आपला राजीनामा दिला आहे. निवडणुकीत ‘एनडीए’ला १२५ जागा प्राप्त झाल्या आहेत. त्यात भाजपला ७४ जागा तर जेडीयूला फक्त ४३ जागा मिळाल्या आहेत.

महागठबंधनने तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वात एनडीएला ताकदीची टक्कर दिली होती. मतमोजणीपूर्व सर्व अंदाजांमध्ये बिहारमध्ये सत्ताबदलाचे वारे होते. मात्र, अगदी निसटत्या अशा स्वरुपाचा विजय एनडीएला प्राप्त झाला आहे. या निवडणुकीत चिराग पासवान यांच्या नेतृत्वातील लोजपामुळे जेडीयूची मते घटल्याचा अंदाज आहे. लोजपाने एनडीएशी फारकत घेऊन फक्त जेडीयूला विरोध करण्यासाठी आपले उमेदवार उभे केले होते. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : पीकविम्याचे बदल शेतकऱ्यांच्या किती फायद्याचे?

Weekly Weather : कमाल, किमान तापमानात वाढ; उष्णतेच्या लाटेची शक्यता

Mahabeej Seed : महाबीजने बियाण्यात साधली विक्रमी वाढ

Unseasonal Rain : नगरसह नेवासा, पारनेर, शेवगावमध्ये वादळी पाऊस

Summer Groundnut Sowing : उन्हाळी भुईमुगाची लागवड यंदा कमी प्रमाणात

SCROLL FOR NEXT