'Nisarga' hits farmers in Nagar district
'Nisarga' hits farmers in Nagar district 
मुख्य बातम्या

नगर जिल्ह्यात ‘निसर्ग'चा शेतीपिकांना फटका

टीम अॅग्रोवन

नगर : कोकण आणि मुंबईला तडाखा देणारे निसर्ग चक्रीवादळ नाशिकच्या दिशेने सरकत असताना त्याचा अकोले, संगमनेर, पारनेर, नगर तालुक्‍याच्या पश्‍चिम भागालाही बुधवारी (ता.३) सायंकाळी तडाखा बसला. दोन दिवसांत झालेल्या पुर्वमोसमी पावसाने शेतीपिकांचे नुकसान झाले. पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. नुकसानीची माहिती घेतली जात असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी सांगितले. 

अकोले भंडारदरा परिसरातील बारी, रतनवाडी, घाटघर, साम्रद, तिरढे, खिरविरे, चोंडे परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पर्जन्यवृष्टी सुरू झाली होती. वादळामुळे झाडे, विजेचे खांब आणि अनेक घरांच्या भिंती पडल्या. अनेक घरांवरील कौले उडाली. परिसरातील जनतेची त्यामुळे धावपळ उडाली. या शिवाय जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्‍वभूमीवर दोन दिवसांपासून नगरच्या अनेक भागात सलग तीन दिवस पाऊस झाला. 

अकोले तालुक्‍यातील आंबेवाडी, रतनवाडी, साम्रद, राजूर, समशेरपूर, अकोले या भागात जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. खिरविरे विभागातील जिल्हा परिषद शाळांचे, चंदगीरवाडी व इदेवाडी येथील शाळेच्या इमारतींचे मोठे नुकसान झाले. लहित बुद्रुक येथील सागर पांडूरंग चौधरी (वय३२) या तरुणाचा अंगावर भिंत पडल्याने मृत्यू झाला. 

संगमनेर तालुक्यात शेती, चारापिकांचे नुकसान झाले. पारनेर तालुक्‍याला जोडणाऱ्या घाटात काही ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. सावरगाव घुले येथील प्राथमिक शाळेमागील विजेचे चार खांब, तर रोकुड वस्तीजवळील तीन खांब पडले. मांडवे गावात घरांचे व गोठ्यांचे पत्रे उडाले. बिरेवाडीत डाळिंबांच्या बागांचे नुकसान झाले. नेवासा तालुक्यात सोनईत बाळासाहेब गडाख यांच्या पॉलिहाऊसचे आडीच लाखाचे, बाळासाहेब दरंदले यांचे दीड लाखाचे, दत्ता सोनवणे यांचे एक लाखापेक्षा अधिकचे नुकसान झाले. लांडेवाडी, हिंगणी येथे वादळाचा फटका बसला.

पॉलीहाऊसमधील फुलपिकांचेही नुकसान झाले. रस्त्यावरही झाडे उन्मळून पडल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. नुकसानीची कृषी व महसूल विभाग माहिती घेत आहे. पंचनामे करण्यात येणार आहेत.  विजेचे ब्रेक-डाऊन 

निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्‍वभूमीवर खबरदारीची उपाययोजना म्हणून जिल्हामधील बहूतांश भागात विजेचे ब्रेकडाऊन करण्यात आले. त्यामुळे वीजपुरवठा दिवसभर चालू-बंद होता. बहूतांश भागात बुधवारी रात्री उशिरापर्यंत वीज नव्हती.  अकोले, संगमनेरमध्ये जोरदार सरी 

अकोले, संगमनेर तालुक्यात जोरदार पाऊस झाला. घाटघर येथे तब्बल १३१ मिलीमीटर, तर रतनवाडी येथे १०८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. याशिवाय पांजेरत ९१, वाकी येथे ६५, भंडारदरा येथे ७३, निळवंडे येथे ९८, आढळा येथे ४५, अकोले येथे ९१, संगमनेरला ५४, ओझरला ४३, श्रीरामपुरला ४० मिलीमीटर पाऊस झाल्याची नोंद झाली.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur Dam : कोल्हापूर जिल्ह्यात गतवर्षीपेक्षा अधिक पाणीसाठा, शेतीसाठी दोन आर्वतने मिळणार?

Brazil Flood : ब्राझीलमध्ये पुरामुळे ५६ लोकांचा मृत्यू

Shirur Lok Sabha : शेती, बेरोजगारी, वाहतूकप्रश्‍न ‘जैसे थे’

Sugarcane FRP : ‘सोमेश्वर’चा शंभर रुपयांचा दुसरा हप्ता आज देणार

Sugar Industry : साखर उद्योग प्राप्तिकरातून मुक्त केला ः पाटील

SCROLL FOR NEXT