जिल्ह्यात नऊ ठिकाणी अखेर ऑनलाइन नोंदणी सुरू
जिल्ह्यात नऊ ठिकाणी अखेर ऑनलाइन नोंदणी सुरू 
मुख्य बातम्या

नगर जिल्ह्यात नऊ ठिकाणी अखेर ऑनलाइन नोंदणी सुरू

टीम अॅग्रोवन

नगर ः मूग, उडीद, सोयाबीनची शेतकऱ्यांना हमी दराने विक्री करता यावी यासाठी नगर जिल्ह्यामध्ये नऊ ठिकाणी खरेदी केंद्रे सुरू होत असून तेथे बुधवार (ता. ३) ऑनलाइन नोंदणी सुरू करण्यात आली आहे. शासनाने ठरवल्याप्रमाणे सूर न होता उशिराने ऑनलाइन नोंदणी सुरू झालेली आहे. मात्र, सध्या तरी ९ आक्‍टोबरपर्यंतच नोंदणी सुरू राहणार आहे. नऊ केंद्राशिवाय अजून पाच ठिकाणी केंद्रे सुरू करण्याचे प्रस्तावित आहे.

खरिपातील मूग, उडदाचे पीक हाती आले आहे. सोयाबीनला अजून काही दिवस अवधी आहे. मात्र, यंदा सोयाबीनचेही बऱ्यापैकी उत्पादन हाती आले आहे. नगरसह जिल्हाभरातील बाजार समित्यात मात्र मालाचा दर्जा चांगला नसल्याचे कारण पुढे करत हमी दरापेक्षा कमी दराने मूग, उडीद, सोयाबीनची सर्रास खरेदी केली जात आहे. हमीदरापेक्षा कमी दराने शेतमालाची खरेदी झाली तर त्या व्यापाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश आहेत. मात्र, कोणत्याही बाजार समितीने आत्तापर्यंत एकही कारवाई केलेली नाही.

जिल्हा उपनिबंधक कार्यालयही ‘तक्रार नसल्याचे कारण पुढे केले जात आहे. जिल्ह्यामध्ये सोयाबीन, मूग, उडीद याचे किती उत्पादन निघेल याचा अंदाज घेऊन जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने हमी केंद्रे सुरू करण्याची गरजेबाबत वरिष्ठ कार्यालयाला कळवले होते. खरेदी केंद्रे सुरू होण्याआधी शासनाने शेतकऱ्यांनी सोयाबीन, मूग, उडीद विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी करण्याचे सांगितले होते. त्यानुसार बुधवार (ता. ३) पासून नगरमध्ये नऊ ठिकाणी ऑनलाइन नोंदणी सुरू झाली आहे.

शासनाने २५ सप्टेंबरपासून मूग, उडदाची तर १ आक्‍टोबरपासून सोयाबीनची नोंदणी सुरू असल्याचे सांगितले होते. प्रत्यक्षात मात्र नऊ दिवस उशिरा नोंदणी सुरू झालेली असली तरी सध्यातरी ९ आक्‍टोबरपर्यंतच नोंदणी सुरू राहणार आहे.

ऑनलाइन नोंदणीचे केंद्रे श्रीगोंदा ः तालुका खरेदी विक्री संघ कर्जत ः बापूसाहेब देशमुख विविध कार्यकारी सोसायटी, राशीन जामखेड ः पुणश्‍लोक अहल्यादेवी होळकर कृषी प्रक्रिया उद्योग शेवगाव ः जगदंबा महिला ग्राहक सहकारी सोसायटी नगर ः तालुका खरेदी विक्री संघ पारनेर ः अमरसिंह फर्मा प्रोड्युसर कंपनी राहुरी ः तालुका खरेदी विक्री संघ श्रीरामपूर ः मुळा-प्रवरा फर्मा प्रोड्युसर कंपनी राहाता ः साईकृपा फर्मा प्रोड्युसर कंपनी, कोल्हार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

Agriculture Development : शेती विकासाला केंद्र सरकारने कायम प्राधान्य दिले

Crop Insurance : गतवर्षीच्या खरिपातील ३० कोटी पीकविमा मंजूर

SCROLL FOR NEXT