Nine and half lakh quintals sugar production Nanded region
Nine and half lakh quintals sugar production Nanded region 
मुख्य बातम्या

नांदेड विभागात साडेनऊ लाख क्विंटलवर साखर उत्पादन

टीम ॲग्रोवन

नांदेड : प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयातंर्गंत नांदेड विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर या चार जिल्ह्यांतील १३ साखर कारखान्यांनी यंदाच्या गाळप हंगामामध्ये बुधवार (ता. ८) पर्यंत ९ लाख ९९ हजार ४७ टन उसाचे गाळप केले. सरासरी ९.७८ टक्के उताऱ्याने ९ लाख  ७७ हजार ५० टन साखरेचे उत्पादन घेतले आहे.

नांदेड विभागातील चार जिल्ह्यांतील यंदाच्या हंगामात ऊस गाळपाचे परवाने मिळालेल्या १७ पैकी १३ साखर कारखान्यांनी बुधवार (ता. ८) पर्यंत केलेल्या ऊस गाळपाची माहिती प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयास सादर केली. त्यानुसार परभणी जिल्ह्यातील ५ पैकी ३ खासगी साखर कारखान्यांनी २ लाख २२ हजार २४५ टन उसाचे गाळप केले. सरासरी ९.४२ टक्के उताऱ्याने २ लाख ९३ हजार ३४० क्विंटल साखर उत्पादन घेतले. 

पूर्णा तालुक्यातील बळिराजा शुगर्सचा साखर उतारा सर्वाधिक १०.१९ टक्के आला आहे. हिंगोली जिल्ह्यातील ३ सहकारी आणि १ खासगी साखर कारखान्याने ३  लाख १४ हजार ९४७ टन उसाचे गाळप केले. सरासरी १०.४६ टक्के उताऱ्याने ३ लाख २९ हजार ३०० क्विंटल साखर उत्पादन घेतले. शिरूर कारखान्याचा साखर उतारा सर्वाधिक ११.१२ टक्के आला. नांदेड जिल्ह्यातील ४ पैकी २ सहकारी आणि २ खासगी साखर कारखान्यांनी एकूण २ लाख ७३ हजार ६८५ टन उसाचे गाळप केले. सरासरी ९.४९ टक्के साखर उताऱ्याने २ लाख ५९ हजार ६५० क्विंटल उत्पादन घेतले.

भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचा (युनिट ४) साखर उतारा सर्वाधिक १०.०८ टक्के आला आहे. लातूर जिल्ह्यातील २ सहकारी आणि २ खासगी साखर कारखान्यांनी १ लाख ८८ हजार १७० टन उसाचे गाळप केले. सरासरी ९.५२ टक्के साखर उताऱ्याने १ लाख ७९ हजार ५० क्विंटल साखर उत्पादन घेतले. सिध्दी शुगर्सचा साखर उतारा सर्वाधिक ९.४१ टक्के आला.

ऊस गाळप, साखर उत्पादन, साखर उतारा 

जिल्हा कारखाने संख्या ऊस गाळप (टन) साखर उत्पादन (क्विंटल) उतारा (टक्के)
परभणी ३  २२२२४५ २०९३४० ९.४२
हिंगोली  ३१४९४७ ३२९३००  १०.४६
नांदेड  ४  २७३६८५  २५९६५० ९.४९
लातूर १८८१७०  १७९०५० ९.५२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

Agriculture Development : शेती विकासाला केंद्र सरकारने कायम प्राधान्य दिले

Crop Insurance : गतवर्षीच्या खरिपातील ३० कोटी पीकविमा मंजूर

SCROLL FOR NEXT