निफाड ८.४ अंशावर; तापमानातील चढउतार सुरूच
निफाड ८.४ अंशावर; तापमानातील चढउतार सुरूच 
मुख्य बातम्या

निफाड ८.४ अंशावर; तापमानातील चढउतार सुरूच

टीम अॅग्रोवन

पुणे : राज्याच्या अनेक भागांत मुख्यत: कोरडे हवामान आहे. होळीनंतर किमान तापमानात वाढ होऊन थंडी कमी होते. परंतु मागील दोन दिवसांपासून थंडीत वाढ झाली  आहे.  शुक्रवारी (ता.१३) उत्तर महाराष्ट्रातील निफाड येथे राज्यातील नीचांक ८.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता.१४) राज्याच्या तापमानात चढउतार होण्याची शक्यता असून, विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.       पूर्व मोसमी पावसाचा हंगाम सुरू झाला असून, कमाल आणि किमान तापमानात चढउतार होत आहेत. शुक्रवारी (ता.१३) विदर्भातील वर्धा येथे उच्चांकी ३५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर निफाड, धुळे येथे किमान तापमान १० अंशांच्या असपास आहे. जवळच असलेल्या नगर जिल्ह्यात कमाल तापमान ३४ अंशापार आहे. निफाड, नगर, मालेगाव, धुळ्यासह काही ठिकाणी कमाल आणि किमान तापमानात मोठी जवळपास २० अंशांची तफावत असल्याने सकाळी गारठा तर दुपारी चटका अशीच स्थिती आहे. कमाल आणि किमान तापमानातील तफावत कायम राहण्याची शक्यता आहे.  पश्चिमी चक्रावाताच्या स्थितीमुळे अरबी समुद्रावरून येणार पश्चिमी वारे आणि बंगालच्या उपसागरावरून येणारे पूर्वीय वारे यांचा संगम होऊन, पूर्व भारतात पावसाला पोषक हवामान होत आहे. मध्य प्रदेशापासून पूर्व-विदर्भापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. या पूरक स्थितीमुळे ढगांची निर्मिती होऊन विदर्भासह पूर्व भारतात पावसाची शक्यता आहे. शुक्रवारी (ता. १३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे किमाल व किमान (कंसात) तापमान, (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३१.०(१४.७), नगर ३४.०(१४.६), धुळे ३१.४ (१०.२), जळगाव ३०.६(१७.४), कोल्हापूर ३३.०(१८.५), महाबळेश्‍वर २६.६(१३.६), मालेगाव ३३.२ (१३.४), नाशिक २८.५(१२.०), निफाड २८.०(८.४), सांगली ३४.२(१८.६), सातारा ३१.१(१५.१), सोलापूर ३५.४(२२.१), अलिबाग २८.१(१८.९), डहाणू २८.६ (१८.०), सांताक्रूझ २९.३(१७.४), रत्नागिरी ३१.०(२०.८), औरंगाबाद ३१.०(१७.६), परभणी ३४.३(१७.४), नांदेड ३५.५(२१.०), अकोला ३४.३(१८.४), अमरावती ३२.९(१९.०), बुलडाणा ३०.०(१७.७), चंद्रपूर ३२.४(२१.०), गोंदिया ३०.०(१८.२), नागपूर ३४.१(२१.४), वर्धा ३५.८(२२.५).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Department : राज्याला मिळेना विस्तार संचालक

POCRA Subsidy : ‘पोकरा’चे अनुदान लाटण्यासाठी बोगस बिले सादर केल्याचा संशय

Tomato Cultivation : अकोले, संगमनेरमध्ये टोमॅटो लागवडीत घट

Vithhal Sugar Mill : विठ्ठल कारखान्यावरील जप्तीची कारवाई अखेर मागे

Drought Crisis : पाण्याशिवाय जगणं मुश्किल झालंय

SCROLL FOR NEXT