संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

‘मग्रारोहयो’त २८ नव्या कामांचा समावेश

टीम अॅग्रोवन

नागपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. त्यानुसार आता या योजनेत नव्याने २८ कामांचा समावेश करण्यात आला आहे. 

ग्रामीण भागात मजुरांचे स्थलांतर रोखण्यासाठी स्थानिक स्तरावर रोजगार उपलब्धतेत महत्त्वाची भूमिका बजावण्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा वाटा आहे. या योजनेत आता नव्याने २८ कामांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे रोजगार उपलब्धतेच्या कक्षाही रुंदावण्यास मदत होणार आहे.

नव्याने समावेश करण्यात आलेल्या कामांमध्ये शालेय स्वयंपाक निवारा, नाला-मोरी बांधकाम, सिमेंट रस्ता, पेव्हिंग ब्लॉक, डांबर रस्ता, शाळेसाठी, खेळाच्या मैदानासाठी साखळी कुंपण, अंगणवाडी बांधकाम, ग्रामपंचायत भवन, सामूहिक मत्स्यतळे, सार्वजनिक जागेवरील शेततळे, कॉँक्रीट नाला बांधकाम, आरसीसी मुख्य निचरा प्रणाली, भूमिगत बंधारे, सिमेंट नाला बांध, कॉम्पोझिट गॅबियन बंधारा, बचत गटांच्या जनावरांसाठी सामूहिक गोठे, स्मशानभूमी शेड बांधकाम, नाडेप कंपोस्ट मैदानासाठी संरक्षक भिंत, बाजार ओटा बांधणे आदी कामांचा समावेश आहे.

पूर्वी बहुतांश कामे जिल्हा परिषदेचा जलसंधारण विभाग, राज्य शासनाचा लघू पाटबंधारे विभाग, बांधकाम विभागाच्या माध्यमातून केली जात होती. पूर्वी मर्यादित स्वरूपातच कामे होत असत. आता नव्या कामांमुळे रोजगार उपलब्धतेचीदेखील व्याप्ती वाढण्यास मदत होणार आहे. 

‘जलयुक्‍त शिवार’ला मिळणार बळ रोजगार हमी योजनेत नव्याने २८ कामांचा समावेश करण्यात आला आहे. यातील बहुतांश कामे जलयुक्‍त शिवार योजनेशी संबंधित आहेत. सिमेंट नालाबांध, भूमिगत बंधारा, आरसीसी निचरा प्रणाली, शेततळे, सामूहिक मत्स्यतळे यांचा त्यामध्ये समावेश आहे. पावसाळ्यापूर्वी ती करावी लागतील.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT