agri exhibition
agri exhibition  
मुख्य बातम्या

चर्चासत्रांमधून कळणार शेतीच्या नव्या दिशा

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद : येथील बीड बायपासजवळील जबिंदा ग्राउंडवर २७ ते ३० डिसेंबरदरम्यान होणाऱ्या सकाळ-ॲग्रोवनच्या कृषी प्रदर्शनामध्ये शनिवारपासून (ता. २८) होणाऱ्या चर्चासत्रांमध्ये  कृषितज्ज्ञ आणि प्रयोगशील शेतकरी पीक व्यवस्थापन आणि पूरक व्यवसायातील अनुभव शेतकऱ्यांसमोर मांडणार आहेत. शेतकऱ्यांना प्रश्नोत्तरांच्या माध्यमातूनही या तज्ज्ञांशी संवाद साधता येणार आहे. एक्कावन्न युवा शेतकऱ्यांचा चर्चासत्रामध्ये होणार गौरव  प्रदर्शनातील प्रत्येक चर्चासत्रामध्ये मराठवाड्यातील निवडक प्रयोगशील युवा शेतकऱ्यांचा ‘ॲग्रोवन युवा शेतकरी सन्मान’ या पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. या पुरस्कारार्थींमध्ये ४० शेतकरी आणि ११ महिला शेतकऱ्यांचा समावेश आहे. या शेतकऱ्यांनी विविध पीकपद्धती, फळबाग, गटशेती, प्रक्रिया उद्योग, पूरक उद्योगांमध्ये वेगळी ओळख तयार केली आहे. चर्चासत्रांचे वेळापत्रक ता. २८ डिसेंबर ः शनिवार  १)  विषय ः गटशेतीतून समृद्धी      वेळ ः सकाळी ११ ते १      वक्ते ः डॉ. बी. एम. कापसे, औरंगाबाद  २) विषय ः शेतमाल प्रक्रिया उद्योगाची उभारणी      वेळ ः दुपारी ३ ते ५      वक्ते ः गीताराम कदम (न्हावरे, ता. शिरूर, जि. पुणे)  ता. २९ डिसेंबर ः रविवार  १) विषय ः नैसर्गिक शेतीचे अनुभव      वेळ ः सकाळी ११ ते १      वक्ते ः सुभाष शर्मा (यवतमाळ)  २) मधमाशीपालन ः एक पूरक उद्योग      वेळ ः दुपारी ३ ते ५      वक्ते ः  - संजय पवार (व्यवस्थापकीय संचालक, पूर्वा केमटेक प्रा. लि., नाशिक)      - नानासाहेब इंगळे ( देऊळगावसिद्धी, जि. नगर) ता. ३० डिसेंबर ः सोमवार  वेळ ः सकाळी ११ ते १  विषय ः पीकपद्धती बदलातून किफायतशीर शेती  विषय ः उदय देवळाणकर (कृषी विभाग, औरंगाबाद) 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : अवकाळी पावसामुळे एक हजार हेक्टरवर नासधूस

Onion Market : ‘एनसीसीएफ’द्वारे उद्यापासून सुरू होणार कांदा खरेदी

Agriculture Drone : ‘वनामकृवि’मध्ये कृषी ड्रोन तंत्रज्ञान प्रमाणपत्र अभ्यासक्रम

Cotton Cultivation : आठ राज्यांत अतिसघन कापूस लागवड प्रकल्प

Cotton Market : परभणी, हिंगोलीत कापसाची १२.७० लाख क्विंटल खरेदी

SCROLL FOR NEXT