स्टार्टअपच्या माध्यमातून नवउद्योजक घडतील ः डॉ. पाटील
स्टार्टअपच्या माध्यमातून नवउद्योजक घडतील ः डॉ. पाटील 
मुख्य बातम्या

स्टार्टअपच्या माध्यमातून नवउद्योजक घडतील ः डॉ. पाटील

टीम अॅग्रोवन

अकोला : समाजाच्या हितासाठी तरुणांच्या कल्पनांना मूर्त स्वरूप देण्याबरोबरच त्यांच्या प्रयोगांना चालना व प्रोत्साहन मिळण्याकरिता ‘स्टार्टअप फेस्ट’ तरुणांसाठी एक मोठी संधी ठरली. या माध्यमातून भविष्यात अनेक चांगले नवउद्योजक निश्चितपणे घडतील, असा विश्वास कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे राज्यमंत्री, पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र राज्य नावीन्यपूर्ण स्टार्टअप धोरणाच्या अनुषंगाने अकोला ‘स्टार्टअप फेस्ट’अंतर्गत एक नामवंत व्यवसायनिर्मितीची स्पर्धा अर्थात बिझनेस प्लॅन स्पर्धेचे आयोजन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालयात करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्‌घाटन पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. 

व्यासपीठावर जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पोलिस अधीक्षक एम. राकेश कलासागर, सहायक संचालक द. ल. ठाकरे उपस्थित होते.  

पक्ष्यांपासून पिकांचे रक्षण करण्याकरिता बनविलेले यंत्र, कचऱ्यावर विविध प्रक्रिया करणारे यंत्र, चोरांपासून आपली दुचाकी सुरक्षित ठेवण्यासाठी मोबाईलवरून नियंत्रण करणारी यंत्रणा, हळदीवर प्रक्रिया करणारे यंत्र, पायऱ्यांवर सहजपणे क्रेटची वाहतूक करणारे उपकरण, नावीन्यपूर्ण डवरणी यंत्र, अंधांसाठी समोर येणाऱ्या अडथळ्यांची सूचना देणारी यंत्र बसविलेली काठी यांसारख्या नावीन्यपूर्ण संकल्पना सर्वांचे आकर्षण ठरले. 

जिल्हाधिकारी पापळकर म्हणाले, ‘‘तरुणांसाठी हा एक चांगला कार्यक्रम आहे. आपल्या कल्पनांना प्रत्यक्ष साकार करून त्याचा समाजासाठी फायदा करून देणारा हा उपक्रम कौतुकास्पद आहे.’’ मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, एम. राकेश कलासागर यांनीही मनोगत व्यक्त केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drip Irrigation : ठिबक सिंचनासाठी ‘जीएसआय’ प्रणालीचा वापर

Agriculture Success Story : हवामान बदलाला सुसंगत शेती वरकड बंधूंची...

Rice Research : ‘बी१’ जीवनसत्त्व अधिक असलेला भात विकसित

Waghad Project : ‘वाघाड’ने घडविला कायापालट

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

SCROLL FOR NEXT