शेजाऱ्यांमध्ये नेपाळला सर्वोच्च स्थान
शेजाऱ्यांमध्ये नेपाळला सर्वोच्च स्थान 
मुख्य बातम्या

शेजाऱ्यांमध्ये नेपाळला सर्वोच्च स्थान : पंतप्रधान मोदी

वृत्तसेवा

जनकपूर, नेपाळ : ‘शेजारी सर्वप्रथम’ या भारताच्या धोरणामध्ये नेपाळला सर्वांत वरचे स्थान आहे, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (ता.११) नेपाळ सरकारला आश्‍वस्त केले. जनकपूर या शहराच्या विकासासाठी शंभर कोटी रुपयांची मदतही मोदींनी जाहीर केली. पंतप्रधान मोदी हे दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी नेपाळमध्ये आले आहेत. जनकपूर येथे स्वागत झाल्यानंतर मोदींनी ‘जय सीयाराम’चा घोष करत येथील नागरिकांशी संवाद साधला. आपण येथे भारताचे पंतप्रधान म्हणून नव्हे, तर प्रधान यात्रेकरू म्हणून आलो आहोत, असे त्यांनी सांगितले. मैत्रीबद्दलचा रामचरितमानसमधील श्‍लोक उद्‌धृत करत मोदींनी नेपाळ सरकारला भारताचा भक्कम पाठिंबा असल्याचे सूचित केले. जनकपूर हे ठिकाण श्रीरामपत्नी देवी सीतेचे जन्मस्थान मानले जात असल्याने हिंदूचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे मोदी यांनी जनकपूर आणि परिसरातील पायाभूत विकासासाठी शंभर कोटी रुपयांची मदत जाहीर केली. २०१४ मध्ये पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून मोदींचा हा तिसरा नेपाळ दौरा आहे. ट्रॅडिशन (परंपरा), टुरिझम (पर्यटन), ट्रेड (व्यापार), टेक्‍नॉलॉजी (तंत्रज्ञान) आणि ट्रान्सपोर्ट (वाहतूक) या पाच "टी''वर भर दिल्यास दोन्ही देशांना त्याचा प्रचंड फायदा होऊ शकतो, असे प्रतिपादन मोदींनी केले. भारत आणि नेपाळला हाय-वे, आय-वे (इन्फॉर्मेशन), रेल्वे, ट्रान्सवे (इलेक्‍ट्रॉनिक संपर्क), वॉटर-वे (जलमार्ग) आणि एअर-वे (हवाई मार्ग) या सर्व मार्गांनी जोडण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. नेपाळमध्ये उतरताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट प्रसिद्ध जानकी मंदिराला भेट दिली. नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी त्यांचे स्वागत केले. मोदींनी मंदिरात षोडशोपचार पूजा केली. या पूजेवेळी तांत्रिक मंत्र, राम-सीतेच्या भजनांसह सोळा धार्मिक विधी केले जातात, अशी पूजा करणारे ते भारताचे पहिले पंतप्रधान ठरले आहेत. नीलम संजीव रेड्डी, ग्यानी झैलसिंग आणि प्रणव मुखर्जी या माजी राष्ट्रपतींनी ही पूजा केली होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Unseasonal Rain : पूर्व विदर्भाला वादळी वाऱ्यासह पावसाचा दणका

Weather Update : विदर्भात गारपीट, वादळी पावसाचा इशारा

Karnataka Drought farmers : कर्नाटकातील शेतकऱ्यांना लवकरच दिलासा; दोन-तीन दिवसांत मिळणार दुष्काळाचे पैसे 

Monsoon 2024 : सलग अकरा महीने उष्णतेची| तीन नवीन ट्रॅक्टर बाजारात दाखल| राज्यात काय घडलं?

Jambhul Season : जांभळाचा हंगाम लांबल्याने जांभूळ पिकाला फटका

SCROLL FOR NEXT