शेतीप्रश्नांसाठी तरुणांच्या चळवळीची गरज : पाटील
शेतीप्रश्नांसाठी तरुणांच्या चळवळीची गरज : पाटील  
मुख्य बातम्या

शेतीप्रश्नांसाठी तरुणांच्या चळवळीची गरज : पाटील

टीम अॅग्रोवन

वैराग, जि. सोलापूर : ‘‘शेतीचे प्रश्न वाढतायेत, ते आगामी काळात सोडविण्यासाठी तरुण शेतकऱ्यांनी शेती चळवळीत उतरण्याची गरज आहे,’’ असे प्रतिपादन वजा उत्पन्नाचा दाखला मिळविणारे देशातील पहिले क्रांतिकारी शेतकरी हिरालाल पाटील यांनी केले.

येथील उद्धवराव पाटील विचार मंचतर्फे वैराग येथील विद्यामंदिर हायस्कूलमध्ये आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थांनी विनायक देशमुख हे होते. दुष्काळी परास्थितीवर मात करण्यासाठी वजा उत्पन्न दाखला व दुष्काळी मेळावा घेण्यात आला. या वेळी छात्र भारती अध्यक्ष प्रा. अर्जुन जाधव, अभियंता दिनकर पाटील, योगेश पाटील, उल्हास पाटील, धनंजय पाटील आदी उपस्थित होते.  

पाटील म्हणाले, ‘‘शेती प्रश्नावर एकसंघपणे लढण्याशिवाय आता पर्याय नाही. उत्पन्न, दर, उत्पादन या सगळ्याचा मेळ बसवणे अवघड झाले आहे.’’

विश्वासराव पाटील म्हणाले, ‘‘शेती उत्पादनाचे खरे वास्तव समोर आले पाहिजे. शेतकऱ्यांचे खरे दुःख जाणून घेतले पाहिजे. कृषी मूल्य आयोगाची अंमलबजावणी झाली पाहिजे. राज्यात चार कृषी विद्यापीठे असून, त्यांच्याकडे १६ पिकांच्या प्रतिक्विंटल उत्पन्न दर आहे. परंतु वजा उत्पन्न दाखला मिळविण्यासाठी कृषी मूल्य आयोगाकडून ‘किमान आधार दर’ याप्रमाणे शेती उत्पन्न दराचा दाखला दिला जातो, तो मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी एकत्रित लढा देण्याची गरज आहे.’’

या वेळी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत थोरात, मृणाल भूमकर, नेताजी घायतिडक, विश्वासराव चव्हाण, हरिश्चंद्र भोसले, सुरेश गुंड, विनायक डोईफोडे, मेजर संजय आवारे, ब्रबुवान काशीद, भालचंद्र मोरे, प्रा. आण्णासाहेब देशमुख, सुभाष डुरेपाटील, नागनाथ काकडे, अण्णा मोरे, मेजर जगन्नाथ आदमाने, अण्णासाहेब कुरुलकर, साहेबराव काशीद, बाबूराव गुंड, बापू मिसाळ आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. भास्कर कापसे यांनी केले. भालचंद्र मोरे यांनी आभार मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disaster Relief Fund : रायगडमध्ये आपत्ती बचावासाठी हजार कोटी

Water Issue : शेतीसाठी ‘धनपूर’ धरणाच्या पाण्याची प्रतीक्षा

Orchard Planting : एक हजार हेक्टरवर सांगलीत फळबाग लागवड

Onion Market : कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पुन्हा धुळफेक; सरकारने दिलेली ९९,१५० टन निर्यातीला परवानगी जुनीच

Fertilizer Demand : चोपडा तालुक्याला २७ हजार टन खतांची गरज

SCROLL FOR NEXT