औरंगाबाद : शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद चर्चासत्रात सहभागी शेतकरी व शास्त्रज्ञ
औरंगाबाद : शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद चर्चासत्रात सहभागी शेतकरी व शास्त्रज्ञ 
मुख्य बातम्या

रेशीम उद्योगाला चालना देण्याची गरज : डॉ. चंद्रकांत लटपटे

Santosh Munde

औरंगाबाद : तुती लागवडीसाठी अनुकूल असलेल्या हवामानामुळे मराठवाड्यातील प्रत्येक खेड्यात तुती लागवडीला प्राधान्य देण्यात यावे. या माध्यमातून रेशीम उद्योगवाढीला चालना देण्याची गरज वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. चंद्रकांत लटपटे यांनी व्यक्‍त केली.

औरंगाबाद येथील कृषी विज्ञान केंद्रात शेतकरी-शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रमांतर्गत ‘मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी फायदेशीर रेशीम शेती’ या विषयावर ते मार्गदर्शन करीत होते. या वेळी कार्यक्रम समन्वयक डॉ. सूर्यकांत पवार, विषय विशेषज्ञ डॉ. किशोर झाडे, डॉ. गीता यादव, विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्राचे रामेश्वर ठोंबरे यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक डॉ. पवार यांनी केले.

डॉ. लटपटे म्हणाले, शेतीपूरक व्यवसाय केल्याशिवाय शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक सुबत्ता येणे नाही. त्यामध्ये रेशीम उद्योग अत्यंत उपयोगी असल्याचे पुढे आले आहे. याशिवाय रेशीममध्ये मोठ्या प्रमाणात संधी असल्याने कितीही शेतकरी सहभागी झाले तरी आजघडीला असलेले दर पडण्याची शक्‍यता नाही. त्यामुळे शास्त्रीय माहिती घेऊन शेतकऱ्यांनी यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन डॉ. लटपटे यांनी केले.

रब्बी पीक लागवड याविषयी डॉ. किशोर झाडे यांनी मार्गदर्शन केले. ज्वारी व हरभरा सुधारित लागवड याविषयी मार्गदर्शन करताना शेतकऱ्यांनी एकात्मिक पीक व्यवस्थापनात तंत्रज्ञानाचा वापर करावा. सुधारित वाण, बीजप्रक्रिया, पेरतेवेळी खते पेरून देणे, विरळणी, तण नियंत्रण, कीड नियंत्रण आदी विषयावर डॉ. झाडे यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन डॉ. रामेश्वर ठोंबरे यांनी, तर डॉ. गीता यादव यांनी मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Brazil Flood : ब्राझीलमध्ये पुरामुळे ५६ लोकांचा मृत्यू

Shirur Lok Sabha : शेती, बेरोजगारी, वाहतूकप्रश्‍न ‘जैसे थे’

Sugarcane FRP : ‘सोमेश्वर’चा शंभर रुपयांचा दुसरा हप्ता आज देणार

Sugar Industry : साखर उद्योग प्राप्तिकरातून मुक्त केला ः पाटील

Onion Rate : कांद्याचे बाजार शुल्क घटवले एक रुपयावरून ५० पैशांवर

SCROLL FOR NEXT