Vamnicom
Vamnicom  
मुख्य बातम्या

‘एफपीओं’ना बळकट करण्याची गरज ः चढ्ढा 

टीम अॅग्रोवन

पुणे ः शेतीमध्ये मातीपासून ते बाजारपेठेपर्यंत समस्या आहेत. या समस्या सोडविण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्या (एफपीओ) अधिक प्रभावी काम करत आहे. त्यांना अधिक बळकट करण्याची गरज आहे, असे मत ‘नाफेड’चे कार्यकारी संचालक संजीवकुमार चढ्ढा यांनी व्यक्त केले. 

वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवारी (ता.१५) आयोजित कार्यक्रमात चढ्ढा बोलत होते. या वेळी स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या केंद्रीय बोर्डाचे संचालक सतीश मराठे, वैकुंठ मेहता संस्थेचे संचालक डॉ. के. के. त्रिपाठी, रजिस्टार व्ही. सुधीर या वेळी उपस्थित होते. 

चढ्ढा म्हणाले, की व्यासायिकतेच्या अभावामुळे सहकार क्षेत्र कमकुवत होत चालले आहे. तर शेतकरी उत्पादक कंपन्या व्यावसायिकतेमुळे सक्षम होत आहेत. शेतीमध्ये मातीपासून ते बाजारपेठेपर्यंत अनेक समस्या आहेत. या समस्या सोडविण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्या एकत्रित येऊन काम करत आहेत. या कंपन्यांमुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाला चांगले दर मिळत असून, अनेक कंपन्या चांगले काम करत आहेत. कंपन्यांच्या माध्यमातून गावागावांत बाजार उभारणे गरजेचे असून, हे बाजार ई-नाम सोबत ऑनलाइन फ्लॅटफॉर्मशी संलग्न करणे गरजेचे आहे. यासाठी केंद्र सरकारने चांगल्या योजनांची आखणी देखील केली आहे. कंपन्यांनी आता शेतीमालाच्या मुल्यवर्धनासाठी केवळ ग्रेडिंग, पॅकिंग पर्यंतच मर्यादित न राहता प्रक्रिया आणि शीतसाखळीमध्ये अधिक सक्षमतेने काम करण्याची गरज आहे.  या वेळी सहकार क्षेत्रावरील स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. आभार व्ही. सुधीर यांनी मानले.

शेतीतून केवळ ३५ टक्के उत्पन्न  शेतीमधील उत्पन्न पद्धत (इन्कम पॅटर्न) बदलत असून, शेतीतून केवळ ३५ टक्के उत्पन्न मिळत आहे. इतर क्षेत्रातून ६० टक्के उत्पन्न मिळत आहे. सहकार क्षेत्रावर ४८ कोटी नागरिक अवलंबून आहेत. मात्र सहकार कायद्यात बदल होत नसल्याने सहकार अडचणीत येत आहे. तर कंपनी कायद्यात सारखे बदल होत असल्याने शेतकरी उत्पादक कंपन्या अधिक चांगले काम करू लागले आहेत. सहकारातील कंट्रोल आणि रेग्युलेशनमुळे सहकाराला बदलण्याची गरज आहे, असे सतीश मराठे म्हणाले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

Agriculture Development : शेती विकासाला केंद्र सरकारने कायम प्राधान्य दिले

Crop Insurance : गतवर्षीच्या खरिपातील ३० कोटी पीकविमा मंजूर

SCROLL FOR NEXT