नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांचा आराखडा आता १५८० कोटींचा
नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांचा आराखडा आता १५८० कोटींचा 
मुख्य बातम्या

नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांचा आराखडा आता १५८० कोटींचा

टीम अॅग्रोवन

नगर : जिल्हा नियोजन समितीच्या जिल्हाभर राबविण्यात येणाऱ्या विविध विकासकामासाठीच्या सर्वसाधारण आराखड्यात नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांत मिळून ३३२ कोटींची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे पाच जिल्ह्यांचा मिळून सुरुवातीला त्या-त्या पालकमंत्र्यांनी १२४७ कोटी ८२ लाखांच्या आराखड्याला मंजुरी दिली होती. त्यात अर्थमंत्री अजित पवार यांनी वाढ केल्याने नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांचा आराखडा आता १५८० कोटींचा झाला आहे.  जिल्हा परिषद, कृषी व अन्य विभागामार्फत जिल्हा नियोजन समितीमार्फत जिल्हाभर विकासकामे करण्यासाठी जिल्हा वार्षिक आराखडा केला जातो. २०२०-२१ या वर्षासाठी प्रत्येक जिल्ह्याने आपापले आराखडे मंजूर केलेले आहे. नाशिक विभागातील नगर, नाशिक, नंदुरबार, जळगाव व धुळे या पाच जिल्ह्यांच्या प्रारूप आराखड्यावर चर्चा करण्यासाठी व त्यातील त्रुटी दूर करण्यासाठी (शुक्रवारी ता. ३१) नाशिक येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्या-त्या जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी, अधिकारी व जिल्हा परिषदांसह अन्य विभागांचे पदाधिकारी  उपस्थित होते.  बैठकीत सर्व बाबीवर चर्चा झाली. यानंतर नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांसाठी मिळून शासनाने १२४७ कोटी ८२ लाखांची आर्थिक मर्यादा कळवलेली होती. त्यात उपमुख्यमंत्री पवार यांनी चर्चेअंती मिळून ३३२ कोटी १८ लाखांची वाढ केली. त्यामुळे हा विभागाचा १५८० कोटींचा सर्वसाधारण अंतिम आराखडा तयार झाला आहे. सर्वच जिल्ह्यांचा नियोजन आराखड्यात चांगली वाढ मिळाली असल्याने जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळणार असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री पवार यांनी व्यक्त केला आहे.  जिल्हानिहाय झालेली वाढ   नगर ः ९३ कोटी ६१ लाख नंदुरबार ः ४५ कोटी ४३ लाख  धुळे ः ४२ कोटी ७२ लाख  जळगाव ः ७४ कोटी २८ लाख नाशिक ः ७६ कोटी १४ लाख   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disaster Relief Fund : रायगडमध्ये आपत्ती बचावासाठी हजार कोटी

Water Issue : शेतीसाठी ‘धनपूर’ धरणाच्या पाण्याची प्रतीक्षा

Orchard Planting : एक हजार हेक्टरवर सांगलीत फळबाग लागवड

Onion Market : कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पुन्हा धुळफेक; सरकारने दिलेली ९९,१५० टन निर्यातीला परवानगी जुनीच

Fertilizer Demand : चोपडा तालुक्याला २७ हजार टन खतांची गरज

SCROLL FOR NEXT