Nashik district breaks 87 works of 'Jalukt Shivar'
Nashik district breaks 87 works of 'Jalukt Shivar' 
मुख्य बातम्या

नाशिक जिल्ह्यात ‘जलयुक्त शिवार’च्या ८७ कामांना ब्रेक

Team Agrowon

नाशिक : दुष्काळावर मात करण्यासाठी भाजप-शिवसेना महायुतीच्या सरकारने जलयुक्त शिवार योजना राबविण्यास सुरुवात केली होती. मात्र, जिल्ह्यातच नव्हे, तर विभागात राबविण्यात येणाऱ्या जलयुक्त शिवार योजनेला ब्रेक लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कार्यारंभ आदेश होऊनही ३१ डिसेंबरपर्यंत सुरू होऊ न शकलेले या योजनेचे एकही काम केले जाऊ नये, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील साडेपाच कोटी रुपयांच्या ८७ कामांना ब्रेक लागला आहे. 

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर पूर्वीच्या धोरणामध्ये बदल करून नवीन कामे राबविण्यास सरकारने सुरुवात केली आहे. त्यामुळे महायुतीच्या सरकारची जलयुक्त शिवार योजना पुढे नियमित सुरू ठेवण्याबाबत कोणतेही स्पष्ट निर्देश सरकारने दिलेले नाहीत. ३१ डिसेंबर २०१९ नंतर २०१८-१९ मध्ये आराखड्यातील समाविष्ट कामांना कार्यारंभ आदेश न देण्याचा निर्णय विभागीय आयुक्तालयाने घेतला  आहे. 

जिल्हा नियोजन समिती व जिल्हाधिकारी यांच्या विशेष अधिकाराशिवाय मनरेगाच्या आर्थिक कामांबाबत निर्णय घेऊ नये, कार्यारंभ होऊनही जी कामे सुरू नाहीत, त्यांची माहिती मागविण्यात आली आहे. ३१ डिसेंबर नंतर कोणत्या निधीतून कोणत्या कामांसाठी खर्च झाला, याबाबत अहवाल व स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ५ हजार ३६६ पैकी ५ हजार २७९ कामे पूर्ण आहेत. त्यामुळे ८७ मोठी कामे अपूर्णच आहेत. यामध्ये जिल्हा परिषेदेच्या लघु पाटबंधारे विभागाची १५, वनविभागाची ५, तर कृषी व इतर विभागांची ६७ कामे आहेत. 

योजना गुंडाळणार? 

सरकारने जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत दुष्काळी गावांची निवड करून तेथे जलसंधारणाची कामे हाती घेतली. पावसाचे पाणी तेथील जमिनींमध्ये जिरविण्याचे व त्याद्वारे भूजलपातळीमध्ये वाढ करण्याचे काम केले जात होते. मात्र, आता या योजनेअंतर्गत नवीन वर्षातदेखील कामे केली जाणार की नाहीत, याबाबत संभ्रम आहे. त्यामुळे ही योजना गुंडळणार की काय, अशी शंका आहे. 

तालुकानिहाय अपूर्ण कामाची स्थिती

पेठ ३२
निफाड
चांदवड  २३
सिन्नर
येवला
सुरगाणा
मालेगाव 
सटाणा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Care : दूध, आरोग्य अन् अर्थकारणावरही परिणाम

Environment Emergency : सावधपणे ऐका निसर्गाच्या हाका...

International Labor Day : शेतकऱ्यांकडे माणूस म्हणून कधी पाहणार?

Farmer Issue : लोकशाहीच्या उत्सवात शेतकरी दुर्लक्षितच

Cashew Farming : काजू हंगाम अंतिम टप्प्यात

SCROLL FOR NEXT