On Nashik District Bank Finally the appointment of an administrator
On Nashik District Bank Finally the appointment of an administrator 
मुख्य बातम्या

नाशिक जिल्हा बँकेवर अखेर प्रशासकाची नियुक्ती

टीम अॅग्रोवन

नाशिक: जिल्हा बँकेचे संचालक मंडळ बरखास्त झाल्यानंतर कामकाज करण्याची जबाबदारी प्रशासकांवर देण्यात आली आहे. त्यानुसार प्रशासक मंडळ नियुक्त झाले आहे. सहनिबंधक एम. ए. आरिफ, पणन मंडळाचे विभागीय उप सरव्यवस्थापक चंद्रशेखर बारी यांनी बँकेत येऊन कार्यभार स्वीकारला. 

उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार, अध्यक्ष केदा आहेर यांनी एक आठवडा मुदतवाढ मागितली होती. त्यावर उच्च न्यायालयात सुनावणी झालीच नाही. आहेर यांनी आपला पदभार येत्या सात दिवसांत प्रशासकाकडे द्यावा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. या विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी दोन आठवड्यांचा कालावधी आहे. मात्र, प्रतिवादीतर्फे सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल करण्यात आला होता. सहकार विभागाने जिल्हा बँकेचा कार्यभार समितीने घ्यावा, असे आदेश काढले होते. त्यानुसार उच्च न्यायालयाच्या या निर्णयाने बॅंकेच्या सत्ताधारी आमदार, माजी खासदारांना मोठा राजकीय धक्का बसला. 

नाबार्ड बॅंकेने २०१८ मध्ये कलम ११० ‘अ’ अन्वये बॅंकेतील अनियमिततांमुळे केलेल्या चौकशीनंतर प्रशासकांची नियुक्ती केली होती. त्याला आहेर यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. 

आहेर यांच्या अध्यक्षपदाचा मार्ग बंद 

या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली तरी त्यात प्रतिवादींचा युक्तिवाद झाल्यानंतरच निर्णय होणार आहे. त्यात किमान एक सुनावणी होईल. अद्याप सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात आलेली नाही. उच्च न्यायालयात केलेला विनंती अर्जाची सुनावणी राहिली. त्यामुळे आहेर यांच्या अध्यक्षपदाचा मार्ग बंद झाला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Unseasonal Rain : पूर्व विदर्भाला वादळी वाऱ्यासह पावसाचा दणका

Weather Update : विदर्भात गारपीट, वादळी पावसाचा इशारा

Karnataka Drought farmers : कर्नाटकातील शेतकऱ्यांना लवकरच दिलासा; दोन-तीन दिवसांत मिळणार दुष्काळाचे पैसे 

Monsoon 2024 : सलग अकरा महीने उष्णतेची| तीन नवीन ट्रॅक्टर बाजारात दाखल| राज्यात काय घडलं?

Jambhul Season : जांभळाचा हंगाम लांबल्याने जांभूळ पिकाला फटका

SCROLL FOR NEXT