राज्यस्तरीय कला व क्रीडा स्पर्धेत अहमदनगरच्या कृषी विभागाच्या संघाने ४३ गुण मिळवत सर्वसाधारण विजेतेपद पटकावले.
राज्यस्तरीय कला व क्रीडा स्पर्धेत अहमदनगरच्या कृषी विभागाच्या संघाने ४३ गुण मिळवत सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. 
मुख्य बातम्या

कृषी विभागाच्या क्रीडा स्पर्धेत नगरला सर्वसाधारण विजेतेपद

टीम अॅग्रोवन

पुणे ः कृषी विभाग व महाराष्ट्र राज्य कृषी सहयक संघटना यांच्या माध्यमातून राज्यस्तरीय कला व क्रीडा रत्नागिरी जिल्ह्यातील दापाेली येथील डाॅ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात शनिवार (ता. १०) ते सोमवार (ता. १२) दरम्यान घेण्यात आल्या. या स्पर्धेत अहमदनगरच्या कृषी विभागाच्या संघाने ४३ गुण मिळवत सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. तर रत्नागिरी संघाने ४१ गुण मिळवत उपविजेतेपद पटकावले.  क्रिकेटमध्ये पुरुषांच्या गटामध्ये बीड संघाने विजेतेपद, लातूर संघाने उपविजेतेपद पटकावले. महिला गटामध्ये नगर संघाने विजेतेपद, रत्नागिरी संघाने उपविजेते पद पटकावले. खो-खोच्या क्रीडा प्रकारामध्ये महिला गटामध्ये पुणे संघाने विजेतेपद, नगर संघाने उपविजेते पद पटकावले. कबड्डीमध्ये पुरुष गटामध्ये कोल्हापूर संघाने विजेतेपद, ठाणे संघाने उपविजेतेपद पटकावले. महिला गटामध्ये रत्नागिरी संघाने विजेते पद पटकावले. हाॅलिबाॅलमध्ये पुरुष गटामध्ये सोलापूर संघाने विजेतेपद, नाशिक संघाने उपविजेते पद पटकावले. याशिवाय गोळा फेक, धावणे, लांब उडी, टेबल टेनिस, बुद्धिबळ, कॅरम हे क्रीडा प्रकार घेण्यात आले. तसेच कला प्रकारामध्ये पालघर संघाने तारफा नृत्याचे प्रात्यक्षिक दाखवून पहिला क्रमांक पटकावला. कोल्हापूर संघाने पोवडा दाखवून दुसरा क्रमांक मिळवला. यामध्ये कृषी आयुक्तालय, कोकण, नाशिक, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, लातूर, अमरावती, नागपूर या विभागांतील पुरुष १२६९, महिला २६९ असे एकूण १५३८ खेळाडू सहभागी झाले आहेत. या कला व क्रीडा स्पर्धा पुण्याचे विभागीय कृषी सहसंचालक विजयकुमार इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आल्या होत्या.  ठाणे विभागीय कृषी सहसंचालक विकास पाटील, अधीक्षक कृषी अधिकारी विनयकुमार आवटे, रफिक नाईकवडी, दादाराम सप्रे, उमेश पाटील, बसवराज मास्तोळी, काशिनाथ तरकसे, पंडित लोणारे, अंकुश माने, आरीफ शहा, दीपक कुटे, बाळासाहेब मोरे, शिरीष जाधव, कांतिलाल पवार, रवींद्र सहाणे, समीर घुमे, राजकुमार डोंगरे यांनी मुख्य क्रीडा समन्वयक म्हणून काम पाहिले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT