नगर जिल्ह्यात टॅंकरचा आकडा साडेआठशे 
नगर जिल्ह्यात टॅंकरचा आकडा साडेआठशे  
मुख्य बातम्या

नगर जिल्ह्यात टॅंकरचा आकडा साडेआठशे 

टीम अॅग्रोवन

नगर : जिल्ह्यातील नागरिकांची तहान भागविण्यासाठी प्रशासनातर्फे ८४९ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. टंचाईची स्थिती निर्माण झाल्याने झपाट्याने टॅंकर सुरू होत आहेत. श्रीरामपूर वगळता जिल्ह्यातील तेरा तालुक्‍यांतील ५९१ गावे व तीन हजार ३०० वाड्या-वस्त्यांवरील १४ लाख एक हजार २१० लोकसंख्येसाठी ८४९ टॅंकर रोज धावत आहेत. 

गेल्या वर्षी पावसाने हात आखडता घेतल्याने दुष्काळाचे तीव्र सावट आहे. ग्रामीण भागातील टंचाईग्रस्त गावांतून टॅंकर मागणीच्या प्रस्तावांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. सध्या श्रीरामपूर वगळता जिल्हाभर टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. 

पाथर्डी तालुक्‍यात सर्वाधिक १५५ टॅंकरद्वारे ११४ गावे व ५८९ वाड्या-वस्त्यांवरील दोन लाख ३८ हजार ६९३ लोकसंख्येसाठी पाणीपुरवठा करण्यात येतो. राहुरी तालुक्‍यात केवळ तीन टॅंकरद्वारे चार गावांमधील एक हजार ६०४ नागरिकांना पाणीपुरवठा सुरू आहे. सन २००३ नंतर या वर्षी जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत सर्वांत कमी पाऊस झाला. त्यामुळे भूगर्भातील जलस्तर कमालीचा घटला. तीव्र पाणी टंचाईमुळे टॅंकरची संख्या झपाट्याने वाढत आहे. दरम्यान, कोणत्याही स्थितीत नागरिकांची पिण्याच्या पाण्याची अडचण होणार नाही, याची दक्षता घेण्याचा आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे.

तालुकानिहाय टॅंकर  संगमनेर - ७२, अकोले - १५, कोपरगाव - ११, राहुरी - ०३, नेवासे - ५१, राहाता - ०८, नगर - ७०, पारनेर - १३२, पाथर्डी - १५५, शेवगाव - ७०, कर्जत - ९२, जामखेड - ९७, श्रीगोंदे - ७३.    

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disaster Relief Fund : रायगडमध्ये आपत्ती बचावासाठी हजार कोटी

Water Issue : शेतीसाठी ‘धनपूर’ धरणाच्या पाण्याची प्रतीक्षा

Orchard Planting : एक हजार हेक्टरवर सांगलीत फळबाग लागवड

Onion Market : कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पुन्हा धुळफेक; सरकारने दिलेली ९९,१५० टन निर्यातीला परवानगी जुनीच

Fertilizer Demand : चोपडा तालुक्याला २७ हजार टन खतांची गरज

SCROLL FOR NEXT