At Nagalwadi, vegetable fodder was harvested
At Nagalwadi, vegetable fodder was harvested 
मुख्य बातम्या

नागलवाडी येथे भाजीपाला झाला जनावरांचे वैरण

टीम अॅग्रोवन

गिरणारे, नाशिक : साडेचार एकर शेतातील काढणीस आलेले गिलके बाजारात मातीमोल विकण्यापेक्षा थेट जनावरांना वैरण म्हणून खाऊ घातल्याची घटना नागलवाडी (ता.नाशिक) येथे घडली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी अडचणीत आले आहेत. शेतातील उभा शेतमाल मातीमोल विकण्यापेक्षा तो जनावरांना वौरण म्हणून घालत आहेत. तसेच तरुण शेतकरी सागर वसंत भोर आणि त्याचा भाऊ राहुल वसंत भोर यांनी शेतात खुडलेले गिलके गावात स्वतःहून वाटून टाकले. 

जिल्ह्याच्या पश्चिमपट्ट्यात बागायती क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने द्राक्ष, भाजीपाला मोठ्या प्रमाणात असतो. यंदाही हवामान अनुकूल आणि भरपूर पाणी असल्याने उन्हाळी बागायती पिके जोमात आहेत. मात्र, द्राक्षशेतीबरोबर भाजीपाला विकायचा कुठं? गिर्हाईक नाही, व्यापारी माल घेत नाही, परप्रांतातील व्यापारी निघून गेले.

बाजार समितीत मातीमोल बाजारभाव असल्याने भाजीपाला विकायचा कसा? हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. या परिस्थितीत सागर आणि राहुल या भावंडांनी शेतातील गिलके, लाखो रुपये खर्च करून उभारलेल्या शेडनेटमधील सिमला मिरचीचे खुडलेले पीक क्रेटमध्ये भरून थेट गावात मोफत दिले.

रोज ४५ क्रेट गिलके जनावरांना घालन्याशिवाय पर्याय उरला नव्हता. कोरोनाच्या संकटात सामान्य लोकांची उपासमार होत असताना, लॉकडाऊन मूळे शेतातील कामास शेतमजूर मिळत नाही, भाजीपाला मातीमोल विकला जात आहे, शेतमालाची मागणीही रोडावली आहे, त्यात बाजारभाव कवडीमोल असल्याने शेतकरी चिंतेत सापडला असल्याचे दिसून येत आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT