पुण्यात मुठा उजवा कालवा फुटला
पुण्यात मुठा उजवा कालवा फुटला 
मुख्य बातम्या

पुण्यात मुठा उजवा कालवा फुटला

टीम अॅग्रोवन

पुणे : पुण्याच्या पूर्व भागातील उपनगरांसह, दौंड, हवेली, इंदापूर तालुक्यांना पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणीपुरवठा करणाऱ्या मुठा कालव्याला भगदाड पडून भिंत वाहून गेल्याने लाखो लिटर पाणी रस्त्यावर आले. सिंहगड रस्त्यावरील दांडेकर पुलाजवळील रामकृष्ण मठात, घरात, गॅरेज आणि दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. भगदाड बुजवेपर्यंत कालव्यातील पाणी बंद करावे लागणार आहे.

मुठा उजवा कालवा दांडेकर पूल, सिंहगड परिसरातून जातो. गुरुवारी दुपारी या कालव्याची भिंत कोसळली. कालव्याचा भराव फुटल्याने पाणी वाया जात होते. पाटबंधारे विभागाला माहिती कळविल्यानंतर खडकवासला धरणातून कालव्यात सोडण्यात येणारे पाणी बंद करण्यात आले. ताेपर्यंत दांडेकर पूल भागातील झोपडपट्टीत पाणीच पाणी झाले.

अग्निशामक दलाने पाण्याचा प्रवाह थांबविण्यासाठी प्रयत्न केले. नागरिकांच्या घरात पाणी शिरले असून त्यांच्या घरातील गॅस, सिलिंडर अशा अनेक वस्तू वाहून मुठा नदीपात्रात आल्या. दुचाकी चारचाकी वाहनांचेही नुकसान झाले. दरम्यान सिंहगड रस्ता, नीलायम, सारसबाग, दांडेकर पूल, दत्तवाडी, टिळक रोड, नळस्टॉप आदी भागात प्रचंड वाहतुकीची कोंडी झाली होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Policy : धोरण विसंगतीने होतेय शेतकऱ्यांची माती

Sugarcane Industries Problems : साखर उद्योगातील समस्येवर मुख्यमंत्री चर्चा करणार, शिष्टमंडळाला आश्वासन

Bogus Seed : सीमाभागात बोगस बियाणे विक्री रोखण्यासाठी तपासणी

Soil Conservation : ‘भूमी सुपोषण-संरक्षण’चा दीडशे गावांत संकल्प

Hapus Mango : सिंधुदुर्गातील बापर्डे येथे ६०५ ग्रॅमचा हापूस आंबा

SCROLL FOR NEXT