Mulberry on ten thousand five hundred acres in Marathawada
Mulberry on ten thousand five hundred acres in Marathawada  
मुख्य बातम्या

मराठवाड्यात साडेदहा हजार एकरांवर तुती

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद : मराठवाड्यात यंदा ३० नोव्हेंबर अखेरपर्यंत १० हजार ६७१ एकरांवर तुतीची लागवड झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत नव्याने झालेली लागवड व जुनी तुती लक्षात घेता काही प्रमाणात घट झाल्याचे चित्र आहे. 

दुष्काळाच्या आघाताने गतवर्षीच्या तुलनेत मराठवाड्यात तुतीचे क्षेत्र थोडे घटले. तरी पुन्हा एकदा दहा हजार एकरपुढे क्षेत्र झालेल्या मराठवाड्यात सावरत असल्याचे चित्र आहे. शिवाय अलीकडे कोषाच्या दरातील तेजीही रेशीम उद्योगाकडे आकर्षित करीत असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे डिसेंबरपासून पुन्हा पुढील वर्षाच्या तयारीसाठी महारेशीम अभियानाची तयारी केली जाणार आहे. 

मराठवाड्यात गतवर्षी रेशीम उद्योगांतर्गत जळपास ११ हजार एकरपुढे तुतीची लागवड झाली होती. यंदा सुरुवातीला दुष्काळाचा आघात व त्यानंतर पावसाच्या लहरीपणामुळे तुती लागवडीत व्यत्यय निर्माण झाला. त्यावर मात करत रेशीम कोष उत्पादकांनी बाद झालेल्या ठिकाणी व नवीन ठिकाणी तुतीची लागवड करून घटणाऱ्या क्षेत्रातील तफावत कमी करण्याचा प्रयत्न केला आहे.  प्राप्त माहितीनुसार १ एप्रिल ते ३० नोव्हेंबर २०१९ दरम्यान मराठवाड्यात १० हजार २५३ शेतकऱ्यांनी १० हजार ६७१ एकरवर तुतीची लागवड केली.

३० नोव्हेंबर अखेरपर्यंत जुन्या तुती लागवडीपैकी ७४२० एकर क्षेत्र तुती शिल्लक होती. यंदा नव्याने लागवडीचा ५४०० एकरचा लक्षांक देण्यात आला होता. गत पंधरवड्यात अखेरच्या अहवालानुसार २९३५ एकरवर तुतीची लागवड करण्यात आली. त्यामुळे मराठवाड्यातील एकूण तुतीचे क्षेत्र १० हजार ६७१ एकरवर पोचले आहे. गतवर्षी १ एप्रिल ते ३० नोव्हेंबर २०१९ दरम्यान मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत ५६२२ एकरवर तुतीची लागवड झाली होती, अशी माहिती रेशीम विभागाच्या सूत्रांनी दिली. 

३३९४ एकरांवरील तुती बाद

मराठवाड्यात दुष्काळाच्या संकटाने जवळपास ३३९४  एकरांवरील तुती लागवड बाद झाली आहे. त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील ८२७ एकर, जालना ७८०, परभणी ३८७, हिंगोली ३२९, नांदेड २२५, लातूर ५१२, उस्मानाबाद ५६६, तर बीड जिल्ह्यातील ३१३ एकरवरील तुती बाद झाली आहे. दुष्काळात साथ देणारे पीक म्हणून  तुतीकडे पाहिले जात असताना त्यावर आलेले संकट दुष्काळाची तीव्रता अधोरेखित करण्यास पुरेशी आहे. 

जिल्हानिहाय तुतीचे क्षेत्र व शेतकरी संख्या

जिल्हा  शेतकरी  क्षेत्र (हेक्‍टरमध्ये)
औरंगाबाद १६९० १६९०
जालना  १६०१ १६१२
परभणी ५५५ ३९८
हिंगोली ८४६ ८८७
नांदेड ७९७ ९६५
लातूर  ७३१  ७८५
उस्मानाबाद १६८१ १७३१.५
बीड २३५२ २६०३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disaster Relief Fund : रायगडमध्ये आपत्ती बचावासाठी हजार कोटी

Water Issue : शेतीसाठी ‘धनपूर’ धरणाच्या पाण्याची प्रतीक्षा

Orchard Planting : एक हजार हेक्टरवर सांगलीत फळबाग लागवड

Onion Market : कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पुन्हा धुळफेक; सरकारने दिलेली ९९,१५० टन निर्यातीला परवानगी जुनीच

Fertilizer Demand : चोपडा तालुक्याला २७ हजार टन खतांची गरज

SCROLL FOR NEXT