उमराणे बाजार समितीत पावसामुळे चिखलाचे साम्राज्य
उमराणे बाजार समितीत पावसामुळे चिखलाचे साम्राज्य 
मुख्य बातम्या

उमराणे बाजार समितीत पावसामुळे चिखलाचे साम्राज्य

टीम अॅग्रोवन

नाशिक : गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे उमराणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारात चिखल झाला आहे. त्यामुळे याचा परिणाम विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांसह व्यापारी वर्गाला सोसावा लागत असून, कांदा लिलाव करण्यासाठी कसरत करावी लागत आहे. 

कसमादे पट्ट्यातील कांदा उत्पादक येथे विक्रीसाठी येतात. बाजार समितीच्या नवीन जागेवरचे काँक्रिटीकरणाचे काम अपूर्ण असल्याने; तसेच सध्या ते रखडल्याने मुख्य आवारात लिलाव प्रक्रिया होते. या जागेवर काँक्रिटीकरण नसल्याने रिमझिम पावसात चिखल होतो. 

त्यामुळे वाहनधारकांना वाहने लावण्यासाठी; तसेच कांदा मालाचा लिलाव करण्यासाठी व्यापारी वर्गासमोर मोठी अडचण निर्माण होते. याशिवाय जास्त चिखल झाल्यास बाजार समितीलगत असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील बायपास रस्त्यावर लिलाव करावा लागत असल्याने किमान मुख्य आवारात मुरुम टाकण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disaster Relief Fund : रायगडमध्ये आपत्ती बचावासाठी हजार कोटी

Water Issue : शेतीसाठी ‘धनपूर’ धरणाच्या पाण्याची प्रतीक्षा

Orchard Planting : एक हजार हेक्टरवर सांगलीत फळबाग लागवड

Onion Market : कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पुन्हा धुळफेक; सरकारने दिलेली ९९,१५० टन निर्यातीला परवानगी जुनीच

Fertilizer Demand : चोपडा तालुक्याला २७ हजार टन खतांची गरज

SCROLL FOR NEXT