मराठा समाजाचे उद्या ठिय्या आंदोलन
मराठा समाजाचे उद्या ठिय्या आंदोलन 
मुख्य बातम्या

मराठा समाजाचे उद्या ठिय्या आंदोलन

टीम अॅग्रोवन

नाशिक : सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी शहरात उद्यापासून डोंगरे वसतिगृह येथे ठिय्या आंदोलन करण्यात येणार असून, यात जिल्ह्यातील सकल मराठा समाज सहभागी होणार अाहे, अशी माहिती चंद्रकांत बनकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

गंगापूर रोड येथील गंगोत्री अपार्टमेंटमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी अॅड. श्रीधर माने, निवृत्त पोलिस अधिकारी चंद्रकांत बनकर, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागूल, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे हंसराज वडघुले व कार्यकर्ते उपस्थित होते. मराठी क्राती मोर्चाच्या वाटचाली संर्दभात शनिवारी (ता. ४) एक विशेष बैठक घेण्यात आली. त्या बैठकीत झालेले निर्णय या वेळी सांगण्यात आले.

अॅड. माने म्हणाले, ‘‘ही लढाई बौद्धिक पातळीवर लढण्यात येणार असून, त्यासाठी कायदे तज्ज्ञांची समिती नेमण्यात येणार आहे. सरकारने दाखल केलेल्या याचिकेला बळ मिळावे यासाठी जिल्ह्यातही याचिका दाखल करण्यात येणार आहे.’’

बागूल म्हणाले, ‘‘उद्यापासून सुरू होणाऱ्या आंदोलनाची तयारी झाली आहे. या ठिकाणी १०० बाय ३० या आकाराचे स्टेज उभारण्यात येणार आहे. तेथे तालुकानिहाय आंदोलन सुरू राहणार आहे. प्रदेश पातळीवरील नेत्यांकडून आदेश आल्यास त्याच दिवसांपासून चक्का जाम आंदोलन करण्यात येईल. हे आंदोलन सुरू राहावे यासाठी विविध पातळ्यांवर लढा सुरू करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे आंदोलनाला आवश्यक असणारी तज्ज्ञ मंडळी विविध पातळ्यांवर काम करीत आहेत.’’

 ‘‘उत्तर महाराष्ट्र, जिल्हा, शहर, तालुका, गाव पातळीवर समित्या करण्यात आल्या असून, त्यांच्या माध्यमातून हे आंदोलन पुढे सरकणार आहे. आंदोलनावेळी समाज प्रबोधनात्मक गोंधळ, पोवाडे सादर केले जाणार आहेत,’’ असे चंद्रकांत बनकर यांनी सांगितले.

आंदोलनासाठी विविध समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. त्यात जिल्हा सुकाणू समिती, शहर विभाग समिती, तालुका समिती, विधी समिती, निधी संकलन समिती, जनसंपर्क समिती, शिस्त समिती, नियोजन व प्रशासन समितीचा समावेश आहे.

नाशिक समन्वय समिती स्थापन नाशिक समन्वय समितीमध्ये अॅड. माने, चंद्रकांत बनकर, अशोक दुधारे, साहेबराव पाटील, प्रकाश मते, प्रा. हरीश आडके, वडघुले, हिरामण वाघ, राजेंद्र शेळके, योगेश कापसे, उमेश मराठे, हरिदादा निकम, संजय पाटील, साहेबराव दातीर, अशोक पाटील, सुरेश भामरे, अॅड. विजय कातोरे, मुकुंद भोसले, अशोक कदम, बाळासाहेब घडवजे, भारत निघळ, नाना बच्छाव यांचा समावेश करण्यात आला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Vaccination : पावसाळ्यापूर्वी जनावरांचे लसीकरण करा

Summer Sowing : दुष्काळी छायेतही २४ हजार हेक्टरवर पेरा

Summer Sowing : यवतमाळच्या शेतकऱ्यांची उन्हाळी तिळाला पसंती

Onion Export Policy : अस्थिर कांदा धोरणांचे उमटणार राजकीय पडसाद

Onion Export : कांदा निर्यात खुली; मात्र अटी, शर्थींचा खोडा

SCROLL FOR NEXT