पंदेकृवि आणि स्वित्झर्लंडस्थित सेंद्रिय शेती संशोधन संस्थेत करार
पंदेकृवि आणि स्वित्झर्लंडस्थित सेंद्रिय शेती संशोधन संस्थेत करार 
मुख्य बातम्या

सेंद्रिय शेतीसाठी जागतिक दर्जाचे संशोधन होणार

टीम अॅग्रोवन

अकोला : काळाची गरज बनलेल्या सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन आणि संशोधनाच्या उद्देशाने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने पुढाकार घेतला असून, रविवारी (ता. ५) विद्यापिठ आणि स्वित्झर्लंड या देशातील सेंद्रिय शेती संशोधन संस्थेत सामंजस्य करार करण्यात आला. 

सेंद्रिय शेतीला अधिक प्रभावी आणि कालसुसंगत बनविण्यासाठी सेंद्रिय शेती शिक्षण, संशोधन तथा विस्तार कार्यासंदर्भात स्वित्झर्लंडस्थित सेंद्रिय शेती संशोधन संस्था (ॲफआयबीएल, FiBL) आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ यांच्यामधील या करारावर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले आणि FiBL चे संचालक डॉ. उर्स निग्गली यांनी स्वाक्षरी केली. 

याप्रसंगी ॲफआयबीएलचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा स्वित्झर्लंड येथील प्रकल्प प्रमुख डॉ. गुरबीर भुल्लर, दुसरे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अम्रितबीर रेअर यांच्यासह विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, नागपूर येथील कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. एन. डी. पार्लावार, कुलगुरू कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. शशांक भराड, कृषी रसायन व मृदशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. राजेंद्र काटकर, डॉ. नितीन कोंडे, कृषिविद्या विभागाचे डॉ. एम. आर. देशमुख, विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे, सुहास कोळेश्वर उपस्थित होते. 

सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ सुरवातीपासूनच विविध स्तरावर प्रयत्नशील आहे. शेतकऱ्यांसाठी सेंद्रिय शेती पदविका अभ्यासक्रमासह पदवी तथा पदव्युत्तर शिक्षणामध्ये सेंद्रिय शेतीचा अंतर्भाव करण्यात आला. विद्यापीठाने कुलगुरू डॉ. विलास भाले यांच्या मार्गदर्शनात सेंद्रिय शेती विकासासंदर्भात राज्य शासनाला सादर केलेल्या प्रकल्पाला शासनाने मान्यता देत राज्यातील चारही कृषी विद्यापीठांना प्रत्येकी पाच कोटी रुपयांचे अर्थसाह्य केले आहे. 

रविवारी झालेल्या या सामंजस्य कराराच्या माध्यमातून उभय देशातील सेंद्रिय शेती तंत्रज्ञानाची आदान प्रदान होणार असून कृषी शिक्षण घेणारे विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी आणि सामान्य ग्राहक यांना या उपक्रमाचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष लाभ होईल, असा आत्मविश्वास कुलगुरू डाॅ. भाले यांनी याप्रसंगी व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation : 'शिरसाई'चे दहा दिवसांचे उन्हाळी आवर्तन

Cotton Bales Production : खानदेशात यंदा २५ टक्के कापूसगाठी निर्मितीत घट

Paddy Procurement : भरडाई रखडल्याने २१ लाख क्‍विंटल धान गोदामातच

Water Scarcity : ‘हर घर नल से’ नाही, तर टँकरमधूनच पाणी

Banana Market : रावेरातून केळीची रेल्वेने वाहतूक सुरू

SCROLL FOR NEXT