Most applications from Marathwada for the benefit of 'Animal Husbandry'
Most applications from Marathwada for the benefit of 'Animal Husbandry' 
मुख्य बातम्या

‘पशुसंवर्धन’च्या लाभासाठी मराठवाड्यातून सर्वाधिक अर्ज

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद : पशुसंवर्धन विभागांतर्गत विविध लाभाच्या योजनांसाठी सुरू असलेल्या अर्ज प्रक्रियेत मराठवाड्याने आघाडी घेतली आहे. अर्ज करण्यासाठी ४ ते ६ डिसेंबरपर्यंतच्या कालावधीत राज्यातील पहिल्या दहा जिल्ह्यांत मराठवाड्यातील लातूर वगळता सात जिल्ह्यांचा समावेश असल्याचे चित्र आहे. राज्यातील ३४ जिल्ह्यांत ३७ हजार ३२ लाभार्थ्यांनी अर्ज केले होते.

राज्याच्या ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार युवकांसह पशुपालक व शेतकऱ्यांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देत शाश्‍वत अर्थार्जनाचा पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या पशुसंवर्धन विभागाने विविध योजना व उपक्रमांद्वारे ग्रामीण महाराष्ट्राचे अर्थचक्र गतिमान ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. वैयक्‍तिक लाभाच्या योजनांतर्गत प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी राज्यस्तरीय नावीन्यपूर्ण योजनेमध्ये गेली तीन वर्षे ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागणे व लाभार्थी निवड करण्याची पद्धत सुरू करण्यात आली आहे. 

४ ते १८ डिसेंबर दरम्यान या योजनांसाठी अर्ज करण्याची सोय करण्यात आली आहे. https://ah.mahabms.com या संकेतस्थळावर तसेच AH-MAHABMS या गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध अँड्रॉइड मोबाईल ॲप्लिकेशनवरूनही अर्ज व योजनेविषयी माहिती मिळणार आहे. १९६२ किंवा १८००-२३३-०४१८ हा टोल फ्री क्रमांकही अर्जदारांच्या सोयीसाठी देण्यात आला आहे. 

प्रतीक्षा यादीतील क्रमांकानुसार योजनेचा अंदाजे केव्हा लाभ मिळेल हे कळू शकल्यामुळे लाभार्थी हिस्सा भरणे किंवा इतर बाबींकरिता नियोजन करता येणे शक्‍य होणार आहे. अत्यंत सुलभ ऑनलाइन पद्धतीमुळे अर्जदाराने केवळ आपला दिलेला मोबाईल क्रमांक न बदलण्याची खबरदारी घेणे आवश्‍यक आहे. - डॉ. प्रदीप झोड, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्‍त औरंगाबाद

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT