संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

परभणीत मुगाची आवक घटली

माणिक रासवे

परभणी : जिल्ह्यातील मूग उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादनातील घट आणि कमी बाजारभाव असा दुहेरी फटका बसला आहे. पावसामुळे भिजून डागील मुगाची आधारभूत किमतीपेक्षा १२०० ते ३५०० रुपये कमी दराने खरेदी केली जात आहे. उत्पादनात मोठी घट आल्यामुळे बाजार समित्यांमध्ये मुगाची आवक कमीच आहे.

यंदाच्या खरीप हंगामात मुगाची पेरणी झाल्यानंतर पावसाचा दीर्घ खंड पडला होता. यामुळे वाढीच्या परिपक्वतेच्या अवस्थेत पाण्याचा ताण बसला. फूलगळ झाल्यामुळे शेंगा लागल्या नाहीत. काही ठिकाणी विरळ प्रमाणात शेंगा लागल्या. अनेक भागात एकरी एक क्विंटलपेक्षाही कमी उतारा आला आहे.

दीर्घ खंडानंतर ऐन काढणीच्या कालावधीत पावसाची झड लागली होती. दररोजच्या पावसात भिजून शेंगांना मोड फुटले होते. शेंगा भिजल्यामुळे मुगाचे दाणे डागील झाले आहेत. चमकी वाणासदेखील चमक राहिलेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये आधारभूत किंमत (५,५७५ रुपये) पेक्षा कमी बाजारभाव मिळत आहेत. चमकी मुगास ४००० ते ४२०० रुपये प्रतिक्विंटल, मोगलाई मुगास ३५०० ते ४००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहेत.

गेल्या महिनाभरात परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवार(ता. २८)पर्यंत १,११८ क्विंटल मुगाची खरेदी झाली आहे. किरकोळ आवक सुरू आहे. आवक कमी असल्यामुळे दररोज लिलाव पध्दतीने खरेदी करता येत नाही असे बाजार समितीतील सूत्रांनी सांगितले.

गतवर्षीप्रमाणे यंदाही काढणीच्या वेळी पाऊस आल्यामुळे मूग डागील झाले आहेत. त्यामुळे बाजारभाव कमी मिळत आहेत. तसेच पावसाच्या खंडामुळे उत्पादनात घट आली आहे. त्यामुळे यंदा मूग उत्पादकांना दुहेरी फटका बसला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Karnataka Drought farmers : कर्नाटकातील शेतकऱ्यांना लवकरच दिलासा; दोन-तीन दिवसांत मिळणार दुष्काळाचे पैसे 

Monsoon 2024 : सलग अकरा महीने उष्णतेची| तीन नवीन ट्रॅक्टर बाजारात दाखल| राज्यात काय घडलं?

Jambhul Season : जांभळाचा हंगाम लांबल्याने जांभूळ पिकाला फटका

Crop Loan : पीक वाटपात विदर्भ आणि मराठवाड्याशी दुजाभाव का?

Land Survey : कोल्हापुरातील सहा तालुक्यांत जमिनींची ‘ई-मोजणी’ सुरू

SCROLL FOR NEXT