Moog productivity triples in Nagar district this year
Moog productivity triples in Nagar district this year 
मुख्य बातम्या

नगर जिल्ह्यात मूग उत्पादकतेत यंदा तिप्पट वाढ

टीम अॅग्रोवन

नगर ः नगर जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाल्याने मुगाच्या उत्पादकतेत गेल्यावर्षीच्या तुलनेत तिप्पट वाढ झाली आहे. कृषी विभागाने पीक कापणी प्रयोगातून काढलेल्या उत्पादकतेनुसार नगर जिल्ह्यात हेक्टरी सरासरी ६७८ किलोचे उत्पादन निघाले आहे. गेल्यावर्षी हेच उत्पादन हेक्टरी केवळ १८० किलो एवढे निघाले होते. यंदा पाथर्डीत सर्वाधिक हेक्टरी ८२९ किलोचे उत्पादन निघाले आहे. श्रीगोंद्यात सर्वांत कमी ४१८ किलोचे उत्पादन निघाले आहे.

जिल्ह्यात यंदा सुरुवातीपासूनच चांगला पाऊस असल्याने मुगाची मोठ्या प्रमाणात पेरणी झाली. यंदा सुमारे ६० हजार हेक्टर क्षेत्रावर मुगाचे उत्पादन घेतले आहे. त्यात नगर, पारनेर, कर्जत तालुक्यात मुगाचे क्षेत्र अधिक होते. मध्यंतरी झालेल्या जास्तीच्या पावसामुळे मुगाचे काही प्रमाणात नुकसानही झाले आहे. करपा रोग पडल्याने मुगाची पाने पिवळी पडल्याने काहीसा मुगाला फटका बसला असल्याचा शेतकऱ्यांचा अंदाज आहे. मात्र, तरीही पावसाचे अन्य वातावरण चांगले असल्याने नगर जिल्ह्यात यंदा गतवर्षीच्या तुलनेत मुगाच्या उत्पादनात तिप्पट वाढ झाली आहे.

कृषी विभागाने पीक कापणी प्रयोगातून काढलेल्या उत्पादकतेनुसार नगर जिल्ह्यात हेक्टरी सरासरी ६७८ किलोचे उत्पादन निघाले आहे. गेल्यावर्षी हेच उत्पादन हेक्टरी केवळ १८० किलो एवढे निघाले होते. यंदा पाथर्डीत सर्वाधिक हेक्टरी ८२९, नगर तालुक्यात ७९४ किलो, जामखेडला ८०४ किलो, नेवाशाला ६९५ किलो, पारनेरला ५६४ किलो, कर्जतला ७६२ किलो, राहुरीला ६२० किलो, संगमनेरला ६३० किलो, श्रीगोंदात ४१८ किलोचे उत्पादन निघाले आहे, असे कृषी विभागातून सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT