अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार 
मुख्य बातम्या

आर. आर. पाटील यांचे स्मारक युवकांना प्रेरणा देणारे ठरेल : अर्थमंत्री मुनगंटीवार

टीम अॅग्रोवन

सांगली   ः आर. आर. पाटील यांनी ग्रामविकास, गृहमंत्री अशी खाती सांभाळली. त्यांनी  राज्यातील लोकांचा विकास हा केंद्रबिंदू डोळ्यांसमोर ठेवून समाजकारण केले. दिवंगत आर. आर. पाटील यांचे स्मारक युवकांना प्रेरणा देणारे ठरणार आहे, असे प्रतिपादन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी  केले.

येथील मिरज रस्त्यावरील महात्मा गांधी विद्यार्थी वसतिगृहाच्या आवारातील नियोजित आर. आर. पाटील स्मृती स्मारकाचे भूमिपूजन शुक्रवारी (ता. १६) झाले. या वेळी मंत्री मुनगंटीवार बोलत होते. या वेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, गृह (ग्रामीण), वित्त व नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार सुमनताई पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार अनिल बाबर, जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

मंत्री मुनगंटीवर म्हणाले, की चंद्रपूरमधून मी निवडणूक जिंकली. त्यानंतर विधिमंडळात आलो. आर. आर. पाटील यांची भाषणे ग्रंथालयात वाचली. १९९५ ला मी पहिले भाषण केले. त्या वेळी मला चिठ्ठी पाठवली. त्यामध्ये आबांनी असे लिहिले होते की, भाषण चांगले झाले. त्यापासून विधिमंडळात ते माझे मार्गदर्शक ठरले.  

जयंत पाटील म्हणाले, की आज आर. आर. पाटील विधानसभेत असते तर सत्तारूढ पक्षाला नाकीनऊ आले असते. ग्रामविकास मंत्री असताना आबांनी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राबवले. आज दिल्लीपासून गल्लीपर्यंत ‘स्वच्छ भारत योजना’ पंतप्रधान नरेंद्र मोदी राबवत आहेत. या योजनेची प्रेरणा संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानातून घेतली आहे.

अजित पवार म्हणाले, की आबा सर्वसामान्य जनतेच्या हिताचे निर्णय घ्यायचे. विलासराव देशमुख, आर. आर. पाटील, गोपीनाथ मुंडे यांची राज्याला गरज होती. पण त्यांच्या अकाली जाण्याने प्रचंड मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Unseasonal Rain : पूर्व विदर्भाला वादळी वाऱ्यासह पावसाचा दणका

Weather Update : विदर्भात गारपीट, वादळी पावसाचा इशारा

Karnataka Drought farmers : कर्नाटकातील शेतकऱ्यांना लवकरच दिलासा; दोन-तीन दिवसांत मिळणार दुष्काळाचे पैसे 

Monsoon 2024 : सलग अकरा महीने उष्णतेची| तीन नवीन ट्रॅक्टर बाजारात दाखल| राज्यात काय घडलं?

Jambhul Season : जांभळाचा हंगाम लांबल्याने जांभूळ पिकाला फटका

SCROLL FOR NEXT