Monsoon withdraws from half of Maharashtra
Monsoon withdraws from half of Maharashtra 
मुख्य बातम्या

निम्म्या महाराष्ट्रातून मॉन्सून माघारी

टीम अॅग्रोवन

पुणे : राजस्थानातून परतीच्या प्रवासाला उशिरा सुरुवात केल्यानंतर मात्र नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) देशातून वेगाने माघार घेण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी (ता. १२) संपूर्ण विदर्भ, तसेच मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राच्या काही भागासह निम्म्या महाराष्ट्रातून मॉन्सून परतल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. 

हवामान विभागाने जाहीर केलेल्या नवीन वेळापत्रकानुसार १७ सप्टेंबर ही मॉन्सूनच्या माघारीची दीर्घकालीन सर्वसाधारण तारीख आहे. यंदा तब्बल १९ दिवस उशिराने ६ ऑक्टोबर रोजी पश्‍चिम राजस्थान आणि लगतच्या गुजरात राज्याच्या काही भागांतून मॉन्सूनने माघार घेतली होती. दोन दिवसांत ८ ऑक्टोबर रोजी वायव्य भारतातून, तसेच ९ ऑक्टोबर रोजी मॉन्सूनने उत्तर भारतातून निरोप घेतला. 

सोमवारी (ता. ११) संपूर्ण झारखंड, बिहारसह मध्य प्रदेश, छत्तीसगडच्या आणखी काही भागांसह, महाराष्ट्र, ओडिशा, पश्‍चिम बंगालच्या काही भागांतून मॉन्सून परतला. त्यानंतर मंगळवारी (ता. १२) ईशान्य भारतातील काही भाग, पूर्व किनारपट्टी आणि महाराष्ट्राचा दक्षिणेकडील भाग वगळता बहुतांश देशातून मॉन्सून परतला आहे. 

निम्म्या महाराष्ट्रातून काढता पाय घेतलेल्या मॉन्सूनच्या परतीची सीमा कोहिमा, सिलचर, कृष्णनगर, बारीपाडा, मलकांगिरी, हनामकोंडा, औरंगाबाद, सिल्वासा अशी होती. दोन दिवसांत महाराष्ट्राच्या आणखी काही भागांसह तेलंगणा आणि कर्नाटकच्या काही भागातून मॉन्सून परतण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Rate : कांद्याचे बाजार शुल्क घटवले एक रुपयावरून ५० पैशांवर

Crop Damage : गारपीट, वादळी पाऊस होऊनही पीक नुकसान नसल्याचा अहवाल

Veterinary : पशुचिकित्सा पुनर्रचनेविरोधात पदविकाधारकांनी थोपटले दंड

Crop Damage : अवकाळी पावसामुळे एक हजार हेक्टरवर नासधूस

Onion Market : ‘एनसीसीएफ’द्वारे उद्यापासून सुरू होणार कांदा खरेदी

SCROLL FOR NEXT