संपूर्ण देशातून मॉन्सून परतला
संपूर्ण देशातून मॉन्सून परतला 
मुख्य बातम्या

संपूर्ण देशातून मॉन्सून परतला

टीम अॅग्रोवन

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (माॅन्सून) रविवारी (ता. २१) संपूर्ण देशातून परतल्याचे हवामान विभागातर्फे जाहीर करण्यात आले. महाराष्ट्रासह बुहतांशी भागांतून माघारी फिरल्यानंतर माॅन्सूनची परतीची वाटचाल तब्बल दोन आठवडे थांबली होती. साधारणत: १५ ऑक्टोबर रोजी देशातून माघार घेणाऱ्या माॅन्सूनने यंदा २१ ऑक्टोबरपर्यंत देशात मुक्काम केला. दक्षिणेकडील राज्यांमध्ये शुक्रवारपासून (ता. २६) ईशान्य मोसमी वारे (ईशान्य मॉन्सून) सक्रिय होणार अाहे. यंदा राजस्थानातून २९ सप्टेंबर रोजी मॉन्सूनने परतीची वाटचाल सुरू केली. परतीचा प्रवास वेगाने करत आठ दिवसांत (६ सप्टें) महाराष्ट्रासह देशाच्या बहुतांशी भागांतून वारे परतले. त्यानंतर बंगालच्या उपसागरातील तितली आणि अरबी समुद्रात आलेल्या लुबन चक्रीवादळामुळे माॅन्सूनची परतीची वाटचाल थांबली होती. मॉन्सून राज्यातून परतल्यानंतर कोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात विजांसह पावसाने हजेरी लावली. केरळ, कर्नाटकमध्येही पावसाचा जोर वाढला हाेता. रविवारी मॉन्सूनने संपूर्ण देशाचा निरोप घेतल्याचे जाहीर करण्यात आले आहे. यापूर्वी २०१६ मध्ये मॉन्सून २८ ऑक्टोबर रोजी आणि गतवर्षी (२०१७) २५ ऑक्टोबर रोजी मॉन्सून परतला होता. 

उत्तर अंदमानात कमी दाबाचे क्षेत्र उत्तर अंदमान समुद्र आणि म्यानमारच्या परिसरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. उत्तरेकडे सरकत असलेल्या या कमी दाब क्षेत्राची तीव्रता आज (ता. २२) वाढण्याची शक्यता आहे. सोमवारपर्यंत (ता. २२) पूर्व मध्य बंगालच्या उपसागरात ताशी ४० ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहणार असल्याने मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT