मॉन्सूनची अंदमानात चाल; पार्टब्लेअरपर्यंत मारली मजल
मॉन्सूनची अंदमानात चाल; पार्टब्लेअरपर्यंत मारली मजल 
मुख्य बातम्या

मॉन्सूनची अंदमानात चाल; पार्टब्लेअरपर्यंत मारली मजल

टीम अॅग्रोवन

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बुधवारी (ता.२७) अंदमान बेटांवर आणखी वाटचाल केली आहे. दक्षिण अंदमानात तब्बल दहा दिवस अडखळलेल्या मॉन्सूनने अंदमान बेटांवरील पोर्टब्लेअरपर्यंतची मजल मारली आहे. शुक्रवारी (ता.२९) सकाळपर्यंतच्या ४८ तासांमध्ये मॉन्सून दक्षिण अरबी समुद्रातील मालदीव आणि कोमोरीन भागात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.   बंगालच्या उपसागरातील ‘अम्फान’ चक्रीवादळामुळे रविवारी (ता.१७)  मॉन्सून दक्षिण अंदमानात दाखल झाला. मात्र चक्रीवादळ उत्तरेकडे सरकून गेल्यानंतर मॉन्सूनचे प्रवाह प्रभावित झाले, तसेच समुद्रावरील बाष्प ओढून नेल्याने या भागात मुख्यतः कोरडे हवामान झाल्याने मॉन्सूनची कोणतही प्रगती झाली नाही. बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातून मॉन्सून वाऱ्यांसाठी पोषक स्थिती तयार होत आहे. बुधवारी (ता.२७) अंदमान बेटांच्या पोर्टब्लअरपर्यंत मॉन्सून दाखल झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. यंदा मॉन्सून चार दिवस उशिराने पाच जून रोजी केरळात पोहोचण्याचा अंदाज आहे. यात चार दिवसांची मागे पुढे तफावत होण्याची शक्यता गृहीत धरण्यात आली आहे. शुक्रवारी (ता.२९) अरबी समुद्रात मॉन्सून दाखल होणार असल्याने पुढील वाटचालीबद्दल आशा उंचावल्या आहेत  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT