monsoon_express
monsoon_express 
मुख्य बातम्या

मॉन्सूनची वाटचाल अद्याप जैसे थे 

टीम अॅग्रोवन

पुणे : बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘अम्फान’ चक्रीवादळामुळे नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांना (मॉन्सून) चालना मिळाली. रविवारी (ता.१७) मॉन्सून दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेटांवर डेरेदाखल झाला. मात्र हे चक्रीवादळ उत्तरेकडे सरकून गेल्यानंतर मॉन्सूनने कोणतीही प्रगती केली नाही. मंगळवारी (ता.१९) मॉन्सूनच्या प्रगतीची वाटचाल जैसे थे होती.  हवामान विभागाने नुकत्याच जाहीर केलेल्या मॉन्सून आगमानाच्या नवीन वेळापत्रकानुसार नैर्ऋत्य मोसमी वारे २२ मेपर्यंत अंदमान बेटांच्या बहुतांशी भागावर दाखल होण्याची शक्यता गृहीत धरण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरातील ‘अम्फान’ चक्रीवादळामुळे पाच दिवस आधीच मॉन्सून दक्षिण अंदमानात दाखल झाला. तर मंगळवारपर्यंत (ता.१९) आणखी काही भागात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र चक्रीवादळ उत्तरेकडे सरकून गेल्यानंतर दोन दिवसांत मॉन्सूनची कोणतही प्रगती झालेली नाही.  दरम्यान यंदा केरळातील मॉन्सूनचे आगमन काहीसे लांबणार आहे. यंदा मॉन्सून चार दिवस उशीराने पाच जून रोजी केरळात पोहोचण्याचा अंदाज आहे. तसेच मॉन्सूनचे अंदमानातील आगमनाचा, केरळातील आगमन आणि देशातील पावसाच्या प्रमाणाशी कोणतही परस्पर संबध नसल्याचे हवामान विभागाने आधीच स्पष्ट केले आहे. तर ‘अम्फाम’ चक्रीवादळामुळे प्रभावित झालेले प्रवाह सुरळीत झाल्यानंतर अंदमान बेटांच्या आणखी काही प्रगती होईल असे, हवामान विभागाच्या सुत्रांनी सांगितले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangli Currant Farmers : सांगली, तासगाव येथील बेदाणा सौदे चार दिवस बंद, शेतकरी अडचणीत

Sand Mining : वाळू उपसून तर बघा...

Food Grains : भरडधान्येच तारतील; आर्थिक आधार देतील

River Pollution : नदी प्रदूषणमुक्त करणारा ‘महाड पॅटर्न’

Agriculture Electricity : कृषी पंपाच्या वीजपुरवठा अनियमित पिकांना फटका; शेतकरी अडचणीत

SCROLL FOR NEXT