मॉन्सून देशाच्या उंबरठ्यावर..! केरळच्या दक्षिण समुद्राचा भाग व्यापला...
मॉन्सून देशाच्या उंबरठ्यावर..! केरळच्या दक्षिण समुद्राचा भाग व्यापला... 
मुख्य बातम्या

मॉन्सून देशाच्या उंबरठ्यावर..! केरळच्या दक्षिण समुद्राचा भाग व्यापला...

टीम अॅग्रोवन

पुणे ः मॉन्सूनने भारत आणि श्रीलंका दरम्यानच्या कोमोरिन भागात आज (ता. २८) प्रगती केली आहे. केरळ  दक्षिणेस आणि देशाच्या उंबरठ्यावर मॉन्सून दाखल झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. रविवारी (ता.२७) श्रीलंकेचा दक्षिण भाग, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांत प्रगती केली होती. आज (ता. २८) अरबी समुद्राच्या आणखी काही भागांत मॉन्सून दाखल होण्यास पोषक वातावरण असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले होते. 

मॉन्सूनने शुक्रवारी (ता. २५) दक्षिण अंदमान समुद्र आणि निकोबार बेटांवर दाखल झाला होता. रविवारी मॉन्सूनने अंदमान बेटांवरील मायाबंदर आणि श्रीलंकेच्या दक्षिण किनारपट्टीपर्यंतचा टप्पा पार केला होतो. दक्षिण अरबी समुद्र, मालदीव-कोमोरीन भाग, दक्षिण बंगालच्या उपसागराचा आणखी काही भागांत मॉन्सून दाखल झाला असल्याचे सांगण्यात आले. रविवारपर्यंत मालदीव-कोमोरीनचा संपूर्ण भाग, अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांत माॅन्सून पोचण्याची शक्यता आहे. तर बुधवारपर्यंत (ता. ३०) मॉन्सून केरळात दाखल होण्यास पोषक वातावरण असल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. 

केरळ किनाऱ्यालगत कमी दाबाचे क्षेत्र केरळ-कर्नाटकच्या किनाऱ्यालगत असलेल्या अरबी समुद्रात रविवारी (ता. २७) कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे, ते सोमवारीही कायम आहे. या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढत आहे. यामुळे केरळ, कर्नाटक किनाऱ्यावर ढगांची दाटी झाली असून, मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर बंगालच्या उपसागरातही सोमवारी कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. ‘मेकुणू’ वादळ निवळून गेले असून, सौदी अरेबिया आणि परिसरावर ठळक कमी दाब क्षेत्र सक्रिय होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Karnataka Drought farmers : कर्नाटकातील शेतकऱ्यांना लवकरच दिलासा; दोन-तीन दिवसांत मिळणार दुष्काळाचे पैसे 

Monsoon 2024 : सलग अकरा महीने उष्णतेची| तीन नवीन ट्रॅक्टर बाजारात दाखल| राज्यात काय घडलं?

Jambhul Season : जांभळाचा हंगाम लांबल्याने जांभूळ पिकाला फटका

Crop Loan : पीक वाटपात विदर्भ आणि मराठवाड्याशी दुजाभाव का?

Land Survey : कोल्हापुरातील सहा तालुक्यांत जमिनींची ‘ई-मोजणी’ सुरू

SCROLL FOR NEXT