दसऱ्याच्या मुहूर्तावर  आगाप खरीप कांदा ५,५५५ रुपये  At the moment of Dussehra Agap kharif onion Rs 5,555
दसऱ्याच्या मुहूर्तावर  आगाप खरीप कांदा ५,५५५ रुपये  At the moment of Dussehra Agap kharif onion Rs 5,555 
मुख्य बातम्या

दसऱ्याच्या मुहूर्तावर  आगाप खरीप कांदा ५,५५५ रुपये 

टीम अॅग्रोवन

नाशिक : जिल्ह्यात दसऱ्याच्या मुहूर्तावर आगाप खरीप लाल कांदा आवक सुरू होण्याची प्रथा आहे. यंदा उमराने येथील श्री. रामेश्‍वर कृषी मार्केट येथे सर्वाधिक १२०० क्विंटल कांदा आवक झाली. येथे प्रति क्विंटलला उच्चांकी ५ हजार ५५५ रुपये दर सावळीराम गोपाळा ठाकरे (कुंभार्डे, ता. देवळा) यांच्या कांद्याला मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.  उमराणे येथील श्री. रामेश्‍वर कृषी मार्केटमध्ये ह. भ. प. नामदेव महाराज यांच्या हस्ते लिलाव सुरू झाले. १२२ वाहनातून एकूण अंदाजे १२०० क्विंटल आवक झाली. किमान ५००, कमाल ५५५५, तर सरासरी दर ३००० राहिला. ठाकरे यांनी सजवलेल्या बैलगाडीतून कांदा विक्रीसाठी आणला होता. या वेळी वेदांती अडत दुकानाचे योगेश व्यंकट पगार यांनी बोली लावली. या वेळी नाशिक जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष खंडू काका देवरे, उमराणेचे माजी सरपंच प्रकाश कांतीलाल ओसवाल, माजी सभापती राजू देवरे, श्रीरामेश्‍वर कृषी मार्केटचे संचालक श्रीपाल प्रकाश ओस्तवाल, पुंडलिक आनंदा देवरे, व्यापारी संतोषजी बाफना, प्रवीण बाफना, गौतम डुंगरवाल, चिंधू खैरे, बबनराव नेहारकर, विलास आहिरे, रितेश आहिरे, दिनेश देवरे, शैलेश देवरे, किशोर जाधव, सचिन देवरे, भाऊसाहेब देवरे, दीपक पगारे, दिनेश पारख, नितीन काला, मनोज कर्णावट, नीलेश पारख, अमोल देवरे, हरिदास जाधव, प्रवीण निकम व मार्केटचे सचिव दौलतराव शिंदे, उपसचिव, कर्मचारी, माथाडी वर्ग आदी उपस्थित होते.  स्व.निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीत खरीप कांद्याची ५५ वाहनांतून अंदाजे १२०० क्विंटल आवक झाली. उमराणे येथील शेतकरी रणजित देवरे यांच्या बैलगाडीतून आणलेल्या कांद्यास सर्वोच्च ५,१५१ रुपये भाव मिळाला. या वेळी कांदा व्यापारी रामराव खंडेराव देवरे यांनी बोली लावली. बाजार समितीचे प्रशासक फयाज मुलानी यांच्या हस्ते लिलाव सुरू झाले. या वेळी कांदा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष संदेश बाफना, कांदा व्यापारी सुनील दत्तू देवरे, महेंद्र मोदी, सचिव नितीन जाधव, सह.सचिव तुषार गायकवाड आदी उपस्थित होते. 

आवेकत मोठी घट  प्रामुख्याने मालेगाव, चांदवड व देवळा तालुक्यांत आगाप लागवडी जास्त असतात, मात्र पावसामुळे गणित बिघडले आहे. बुरशीजन्य रोगांमुळे कांद्याच्या उत्पादनात मोठी घट आली आहे. त्यामुळे जवळपास हजार वाहनातून होणारी आवक २००च्या आत आल्याचे चित्र पाहायला मिळाले. मागणीच्या तुलनेत पुरवठ्यात तूट असल्याने दरात तेजी राहण्याची चिन्हे आहेत.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT