मोदींना लखीमपूर घटनेची  किंमत मोजावी लागेल  : राजू शेट्टी Modi to Lakhimpur incident There is a price to pay: Raju Shetty
मोदींना लखीमपूर घटनेची  किंमत मोजावी लागेल  : राजू शेट्टी Modi to Lakhimpur incident There is a price to pay: Raju Shetty 
मुख्य बातम्या

मोदींना लखीमपूर घटनेची  किंमत मोजावी लागेल  : राजू शेट्टी

टीम अॅग्रोवन

सोलापूर : लखीमपूर घटनेच्या विरोधात महाविकास आघाडीकडून ‘महाराष्ट्र बंद’ केला जाणार असेल, तर आम्हीही या बंदमध्ये सहभागी होऊन या घटनेचा निषेध करणार आहोत. दिवसाढवळ्या न्याय मागणाऱ्या शेतकऱ्यांना गाड्या घालून चिरडले जात असेल, तर ही काय मोगलाई आहे का, असा प्रश्‍न करत मोदी सरकारला त्याची किंमत मोजावी लागेल, अशा शब्दांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पंढरपुरात शुक्रवारी (ता. ८) हल्लाबोल केला.  स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचा मेळाव्यात ते बोलत होते. शेट्टी म्हणाले, ‘‘आम्हीदेखील अशा भाषेत उत्तर देऊ शकतो, हे कुठेतरी दाखवून दिले पाहिजे. ज्या पद्धतीने मध्य प्रदेशमधील मनसौर घटनेनंतर देश पेटवून सोडलेला होता. त्याची किंमत मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांत भाजपला मोजावी लागली. त्याच पद्धतीने आज याची किंमत मोदी सरकारला पर्यायाने भाजपला मोजावी लागेल. एकरकमी एफआरपी देण्यावरून आघाडी सरकार केंद्राकडे बोट दाखवते, तर भाजपवाले हा राज्य शासनाचा निर्णय असल्याचे सांगत आहेत. ही टोलवाटोलवी आम्ही पाहत आणि ऐकत बसणार नाही. त्यासाठी थेट उच्च न्यायालयातही जाणार आहोत.’’ 

ईडी, सीबीआय कशासाठी ते एकद ठरवा  ईडी, सीबीआय, प्राप्तिकर विभाग केवळ राजकीय बदला घेण्यासाठी किंवा ब्लॅकमेल करण्यासाठी आहेत काय, ते एकदा ठरवा, कारण ज्या पद्धतीने या संस्था सध्या काम करत आहेत. ते चक्रावून टाकणारे आहे. कारण धाड का टाकली? यावर आमचा आक्षेप नाही. पण धाडीतून काय निष्पन्न झाले, काय मिळाले हेही पुढे जनतेला कळायला पाहिजे, असेही शेट्टी म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT