खानदेशात मध्यम पावसाची पुन्हा हजेरी
खानदेशात मध्यम पावसाची पुन्हा हजेरी 
मुख्य बातम्या

खानदेशात मध्यम पावसाची पुन्हा हजेरी

टीम अॅग्रोवन

जळगाव ः खानदेशात गुरुवारी (ता. २६) अनेक भागांत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला. गेल्या २४ तासांत सर्वत्र पाऊस बरसला. कुठेही अतिवृष्टी झालेली नसल्याची माहिती आहे. 

गुरुवारी सकाळी व दुपारी अनेक भागांत पाऊस झाला. तर रात्रीही यावल, भुसावळ भागांतील काही मंडळांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. मागील तीन दिवस सर्वत्र पाऊस झाल्याने शेतांमध्ये सखल भागात पाणी तुंबले आहे. जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुक्‍यांमध्ये पावसाने शंभरी गाठली आहे. जळगाव जिल्ह्यात सरासरीच्या १२० टक्‍क्‍यांपर्यंत पाऊस झाला आहे. धुळ्यातही पावसाची टक्केवारी १५० पर्यंत पोचली आहे. तर नंदुरबारात ही टक्केवारी १९० पर्यंत जाण्याची स्थिती आहे. नंदुरबारमध्ये नवापूर, धडगाव व अक्कलकुवा भागांत पाऊसमान अधिक आहे. नवापुरातील भात शेतीला हा पाऊस अनुकूल असल्याचे सांगितले जात आहे. 

सोयाबीनला फटका शक्‍य पाऊस सुरूच राहिला तर खानदेशात सोयाबीनलाही फटका बसू शकतो. अनेक भागांत सोयाबीन मळणीवर येत आहे. दसरा सणापर्यंत मळणी सुरू होईल. परंतु, पुढील तीन-चार दिवस पावसाचा मुक्काम राहिला तर मळणी लांबणीवर पडेल. तसेच, सोयाबीनचे नुकसान होईल, असे सांगितले जात आहे. सद्यःस्थितीत अनेक भागांत सोयाबीनची स्थिती बरी आहे. सोयाबीनची पेरणी नंदुरबारमधील तळोदा, अक्कलकुवा, शहादा, धुळ्यातील शिरपूर, शिंदखेडा, जळगावमधील चोपडा, जळगाव, पाचोरा, जामनेर भागांत बऱ्यापैकी झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील क्षेत्र सुमारे २५ हजार हेक्‍टर आहे. 

कापूस वेचणी लांबली पूर्वहंगामी कापूस पिकात बोंडे उमलली आहेत. त्यांची वेचणी चोपडा, यावल, धुळ्यातील शिरपूर, शिंदखेडा आणि नंदुरबारमधील शहादा, तळोदा भागांत सुरू झाली. परंतु, पाऊस सुरू असल्याने वेचणी थांबली आहे. बोंडे भिजून नुकसान होत आहे, असे घाडवेल (जि. जळगाव) येथील शेतकरी देवेंद्र पाटील म्हणाले. 

गेल्या २४ तासातील पाऊस (मिलिमीटरमध्ये) ः जळगाव ः एरंडोल १५, जळगाव १४, चोपडा १३, भुसावळ १४, यावल १३. धुळे ः शिरपूर १६, शिंदखेडा ११.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Export Duty : कांदा निर्यात शुल्क गोंधळाने कंटेनर खोळंबले

Fertilizers Rate : दरवाढीच्या अफवेने खत उद्योग हैराण

Indian Spices : भारतीय मसाल्यांच्या बदनामीचे षडयंत्र

Turmeric Processing : विडालय टरमरीक प्रोसेसींग क्‍लस्टरसाठी दहा कोटींची तरतूद

Weather Update : विदर्भात गारपिटीचा इशारा

SCROLL FOR NEXT