खानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणी
खानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणी 
मुख्य बातम्या

खानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणी

टीम अॅग्रोवन

जळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व शनिवारी (ता.२२) सकाळी अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. नंदुरबारात मात्र पावसाने हुलकावणी दिली. पाऊस झालेल्या भागातील कोरडवाहू कापूस, ताग या पिकांना लाभ झाला आहे. पुढे रब्बीसाठीदेखील पोषक वातावरण असेल, असे शेतकऱ्यांनी म्हटले आहे.

जळगावात शुक्रवारी रात्री काही वेळ जोरदार पाऊस झाला. मग मध्येच पाऊस बंद झाला. मध्यरात्रीपासून सकाळपर्यंत भिज पाऊस सुरू होता. नदी, नाल्यांना कुठेही पूर आला नाही. नंदुरबार जिल्ह्यात मात्र शुक्रवारी रात्री व शनिवारी सकाळपर्यंत पाऊस नव्हता. फक्त ढगाळ वातावरण कायम होते. धडगाव व अक्कलकुवा येथे काही पाड्यांवर तुरळक पाऊस झाला. शहादा, तळोदा, नवापुरात मात्र पाऊसच आला नाही.

पूर्वहंगामी कापसाचे नुकसान पूर्वहंगामी कापसात उमललेली बोंडे ओली होऊन त्यांचे नुकसान झाल्याची माहिती जळगाव, चोपडा, यावल भागातून मिळत आहे. या कापसाचा दर्जा घसरेल. तसेच तो वेचणीसाठीदेखील सुकर जाणार नाही. पाऊस सुरूच राहिल्यास कापूस काळवंडून १०० टक्के नुकसान होईल, असे सांगण्यात आले.

कोरडवाहू कापूस, उशिरा पेरलेली ज्वारी, ताग या पिकांना या पावसाचा लाभ होणार आहे. रब्बी हंगामाच्या पेरणीसाठीदेखील वाफसा मिळेल. आणखी पाऊस आला तर रब्बीची पेरणी १०० टक्के साध्य होऊ शकते, असे शेतकऱ्यांनी सांगितले.

पावसाची आकडेवारी (मिलिमीटरमध्ये) जळगाव ११, चोपडा ७, यावल ९, रावेर ७, पाचोरा ६, पारोळा ८, अमळनेर ९, एरंडोल ८, धरणगाव ११, भुसावळ ६, जामनेर ६, चाळीसगाव ७, भडगाव ८. धुळे जिल्हा - धुळे ६, शिरपूर ५, शिंदखेडा ८. शिरपूर, मुक्ताईनगर, बोदवड या भागातील पावसाची आकडेवारी मिळू शकली नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT