MLA Bhuyar took stock of the problems in the village
MLA Bhuyar took stock of the problems in the village 
मुख्य बातम्या

आमदार भुयार यांनी घेतला गावातील समस्यांचा आढावा

टीम अॅग्रोवन

अमरावती ः लॉकडाऊनच्या काळात गावस्तरावरील नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागू नये, याकरिता आमदार देवेंद्र भुयार प्रयत्नशील आहेत. त्यासाठी त्यांनी मोर्शी, वरुड तालुक्‍यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये जात ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. 

कोरोनानंतर उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर जनसामान्यांना भेडसावणाऱ्या  अडचणी जाणून घेतल्या जात आहेत. या समस्यांची माहिती घेत प्रशासकीय पातळीवरुन त्यांच्या सोडवणुकीचे प्रयत्नही आमदार भुयार यांच्याकडून होत आहेत. वरुड, मोर्शी तालुक्‍यातील प्रत्येक ग्रामपंचायतींमध्ये जात त्यांनी गावातील नागरिकांचे प्रश्‍न जाणून घेण्याचा प्रयत्न केला. उन्हाची तीव्रता वाढती असल्याने पाणीप्रश्‍न गंभीर होणार आहे.

त्याची दखल घेत पाणीपुरवठा योजनांची कामे, पाणीटंचाई कृती आराखड्याची अंमलबजावणी याविषयी माहिती घेत अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना त्यांच्याव्दारे दिल्या जात आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष सहाय्य योजनेतील कामाचे प्रस्ताव तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिला. 

गावठाण व ई-क्‍लास जागेवरील नियमाकुल प्रस्ताव तसेच अतिक्रमण केलेल्या लोकांचे प्रस्ताव मंजूर करण्याच्या निर्देश त्यांनी दिले. ग्रामपंचायतींनी वाढीव वीज खांबाचे प्रस्ताव तयार करावे. तसेच गाव तिथे व्यायामशाळा ही संकल्पना राबविण्याकरिता पुढाकार घ्यावा. त्याकरिता जागेचे प्रस्ताव सादर करण्याचेही त्यांनी सांगितले. 

गावस्तरावर कोरोना समिती कोरोना नियंत्रणाकरिता जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या सूचनांचे पालन आवश्‍यक आहे. त्याकरीता गावातील युवकांनी पुढाकार घेत कोरोना ग्राम समिती स्थापन करावी. त्या माध्यमातून गावात कोणीही अनधिकृतपणे प्रवेश करणार नाही याबाबत दक्षता घेण्याची सूचना त्यांनी केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT