संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

द्राक्ष बागांचे पंचनामे करताना दिशाभूल

टीम अॅग्रोवन

नाशिक  : द्राक्ष बागांचे पंचनामा केल्यास आपली बाग ‘ग्रेपनेट’साठी ग्राह्य धरली जाणार नाही, अशी चुकीची माहिती काही कृषी कर्मचाऱ्यांकडून पुरवली जात असल्याने बागायतदारांनी संताप व्यक्त केला आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारींनंतर मात्र, हा प्रकार बंद करण्यात आला, असला तरी शेतकऱ्यांची दिशाभूल करणाऱ्या संबंधीत कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.  जिल्ह्यातील पूर्वहंगामी द्राक्ष हंगाम संपूर्णपणे बाधित झाला आहे. तर नियमित द्राक्षबागांचेही संपूर्ण जिल्हाभरात अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. 

अशा परिस्थितीत कृषी विभागातर्फे पंचनामे सुरू आहेत. मात्र ‘जर नुकसानग्रस्त द्राक्ष बागांचे पंचनामे झाले, तर ग्रेपनेट प्रणालीअंतर्गत द्राक्ष निर्यातीसाठी देण्यात येणारे निर्यातक्षम द्राक्ष प्रमाणपत्र मिळणार नाही,’ असे कृषी विभागाच्या पंचनामे करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांमार्फत द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना सांगण्यात येत होते. आशा प्रकारे चुकीची माहिती देण्याचा प्रकार काही ठिकाणी उघडकीस आला. त्यानंतर शेतकऱ्यांनी तक्रारी केल्यानंतर द्राक्षबागांचे सरसकट पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

निर्यातक्षम द्राक्षबागांची निर्यातक्षम नोंदणीमध्ये तपासणी व निर्यातीस शिफारसकामी युरोपीय देशांना द्राक्ष निर्यात करण्याकरिता बागांची नोंदणी आवश्‍यक असते. मात्र, पंचनाम्यादरम्यान संभ्रमता निर्माण झाली होती. दिंडोरी व नाशिक तालुक्यांत कृषी विभागाच्या काही कर्मचाऱ्यांकडून चुकीची माहिती देत असल्याचा प्रकार समोर आला होता. त्यामुळे शेतकरी वर्गात संभ्रम निर्माण झाला होता. जिल्हा कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यालयाला असे प्रकार समजल्यानंतर याबाबत आदेश देण्यात आले आहेत. ही बाब गांभीर्याने घेण्यात आली आहे. द्राक्ष बागांच्या सरसकट पंचनाम्यांचे करून त्यांचा अहवाल सादर करण्यात यावे अशा सूचना करण्यात आले आहेत. 

द्राक्ष बागांचे बाबतीत नुकसान झाले असल्यास, त्याप्रमाणे पंचनामे करण्यात यावेत त्यासाठी कोणाचाही पंचनामा थांबवू नये. नुकसानीचे पंचनामे व निर्यातक्षम द्राक्ष नोंदणी हे दोन वेगवेगळे विषय असून त्यात संभ्रम निर्माण करू नये, अशा सूचना कृषी कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Management : खोडवा उसाचे व्यवस्थापन

Agriculture Processing Industry : प्रक्रिया उद्योगात तयार झाली ओळख

Hanneborg Farm : नॉर्वेमधील ग्राहकांची ‘हॅनेबॉर्ग फार्म’ला पसंती

Weekly Weather : मॉन्सूनच्या आगमनाची पूर्वतयारी सुरू झाली

Cotton Seed : कपाशीच्या बियाण्यांसाठी तेलंगणाची वारी

SCROLL FOR NEXT