गिरीश बापट यांचा मंत्रिपदाचा राजीनामा
गिरीश बापट यांचा मंत्रिपदाचा राजीनामा 
मुख्य बातम्या

गिरीश बापट यांचा मंत्रिपदाचा राजीनामा

टीम अॅग्रोवन

मुंबई ः लोकसभेवर निवडून आल्याने भाजपच्या गिरीश बापट आणि उन्मेष पाटील यांनी मंगळवारी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा सादर केला. याशिवाय बापट यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून मंत्रिपदाचाही राजीनामा दिला. गिरीश बापट आणि उन्मेष पाटील अनुक्रमे पुणे, जळगाव लोकसभा मतदारसंघांतून निवडून आले आहेत. 

लोकसभेवर निवडून आलेल्या सदस्यांच्या नावांची अधिसूचना जारी केली जाते. अधिसूचना प्रकाशित झाल्यापासून १४ दिवसांच्या आत संबंधित खासदाराला आमदारकीचा राजीनामा द्यावा लागतो. भारत निवडणूक आयोगाने नवनियुक्त खासदारांची यादी २५ जून रोजी राष्ट्रपतींना सादर केली आहे. त्यामुळे २५ जूनपासून १४ दिवसांच्या आत लोकसभेवर निवडून गेलेल्या आमदारांना राजीनामा द्यावा लागेल. विधानसभा आणि विधान परिषदेचे मिळून १२ आमदार लोकसभेच्या मैदानात उतरले होते. यापैकी सहा आमदार लोकसभेवर निवडून गेले. आता उर्वरित तीन आमदारांना लवकरच राजीनामा द्यावा लागणार आहे. चंद्रपूरमधून निवडून गेलेले सुरेश धानोरकर यांनी याआधीच आमदारकीचा राजीनामा दिला आहे.

गिरीश बापट यांची नवी इनिंग- १९९५ पासून सलग पाच वेळा विधानसभेवर निवडून आलेल्या गिरीश बापट यांची नवी राजकीय इनिंग सुरू झाली आहे. पुणे महापालिकेचे सदस्य ते लोकसभा सदस्य असा बापट यांचा आतापर्यंत प्रवास राहिला आहे. बापट हे १९९५ मध्ये पहिल्यांदा विधानसभेवर निवडून आले. सलग २५ वर्षे विधानसभेचे सदस्य राहिलेल्या बापट यांनी विविध समित्यांचे काम करताना तालिका अध्यक्ष, लोकलेखा समितीचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. २०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये बापट यांनी अन्न आणि नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण, अन्न आणि औषध प्रशासन ही महत्त्वाची खाती सांभाळली. संसदीय कामकाज मंत्री म्हणून काम करताना त्यांनी सरकार आणि विरोधी पक्षात योग्य तो समन्वय राखला.

लोकसभेवर निवडून गेलेले आमदार- गिरीश बापट (पुणे), उन्मेष पाटील (जळगाव),  सुरेश धानोरकर (चंद्रपूर), हेमंत पाटील (हिंगोली), प्रतापराव पाटील-चिखलीकर (नांदेड), इम्तियाज जलील (औरंगाबाद).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

Agriculture Development : शेती विकासाला केंद्र सरकारने कायम प्राधान्य दिले

Crop Insurance : गतवर्षीच्या खरिपातील ३० कोटी पीकविमा मंजूर

SCROLL FOR NEXT