The Minister of Agriculture interacted with the farmers selling vegetables
The Minister of Agriculture interacted with the farmers selling vegetables 
मुख्य बातम्या

कृषिमंत्र्यांनी साधला भाजीपाला विक्रेत्या शेतकऱ्याशी संवाद

टीम अॅग्रोवन

नाशिक : कृषिमंत्री दादा भुसे हे नियोजित दौऱ्यासाठी मालेगाव येथून नाशिककडे येत असताना मुंबई-आग्रा महामार्गावर ज्येष्ठ शेतकरी भर उन्हात छत्री लावून भाजीपाला विक्री करताना दिसताच आपले वाहन थांबवून त्यांची सदिच्छा भेट घेतली. अन् त्यांच्या कामाची पद्धत, समस्या जाणून घेत त्यांच्या जिद्दीला सलाम करीत त्यांचे कौतुक केले.

कृषिमंत्री श्री. भुसे यांनी गुरुवारी (ता. ४) नाशिक येथे जात असतांना कोकणगाव येथील ज्येष्ठ शेतकरी तसेच वारकरी असलेले लक्ष्मण मोरे हे महामार्गाशेजारी छत्री लावून वांगी, कारली, गिलके, काकडी व कढीपत्ता हा पिकवलेला शेतमाल ते ‘उत्पादक ते ग्राहक’ या संकल्पनेतून विक्री करत असल्याचे त्यांनी पाहिले. त्यावेळी काही वेळ थांबून शेतकऱ्याची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला.

श्री. मोरे हे त्यांच्या शेतातील स्वतः उत्पादित केलेला ताजा भाजीपाला ग्राहकांसाठी दैनंदिन उपलब्ध करून देतात. यामुळे कोरोना पार्श्वभूमीवर ताजा भाजीपाला ग्राहकांनाही मिळत असल्याने स्थानिकांना याचा निश्चितच फायदा होत आहे.तरुणांना लाजवतील या ऊर्जेने ते शेतीत काम करतात.

आपण कष्टाने कमवलेल्या शेतमालाला दोन पैसे अधिक दर मिळावा या संकल्पनेतून ते करत असल्याचे त्यांनी सांगितले.ताजा व स्वस्त भाजीपाला मिळत असल्याने ग्राहकांची पिळवणूक थांबली. व्यापाऱ्यांची मक्तेदारी संपुष्टात आली. त्यांचे वय ७५ वर्षांच्या वर असताना मोठ्या कष्टाने शेती काम करतात. कष्टाने पिकवलेला शेतमाल ते स्वतः ग्राहकांना विक्री करत असल्याने त्यांना समाधान मिळत असल्याचेही ते अभिमानाने सांगतात. कृषिमंत्र्यांनी त्यांच्याशी संवाद साधत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अडचणीच्या काळात अर्थकारण व कामाच्या पद्धती समजून घेत त्यांना शुभेच्छा दिल्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT