milk collection
milk collection  
मुख्य बातम्या

दुधाला दर नसल्याने, दुभती जनावरे सांभाळण्यासाठी शेतकऱ्यांची कसरत 

टीम अॅग्रोवन

सोलापूर ः दुधाला मागणी असूनही केवळ योग्य तो दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. दुभत्या जनावरांच्या चारा आणि पशुखाद्याच्या वाढत्या खर्चासाठी नुसती कसरत करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. आधीच कोरोनामुळे विविध संकटांना तोंड देत शेतकरी पशुपालन करत असताना, त्यात आता दूध दराच्या या समस्येने त्याच्या संकटात आणखीनच भर पडली आहे.  गेल्या तीन ते चार महिन्यांपासून दूध उत्पादक शेतकऱ्यांना याची झळ बसते आहे. सरकारने दूध उत्पादकांचे अतिरिक्त दूध खरेदी करण्याचे आश्वासन दिले असले, तरी त्याचा थेट फायदा गावातील दूध उत्पादकांपर्यंत जाणवत नाही. जिल्हा दूध संघासह खासगी संघही या सगळ्या परिस्थितीचा गैरफायदा घेत असल्याचे दिसत आहे. सरळसरळ शेतकऱ्यांना थेट वाऱ्यावर सोडले जात असल्याचे दिसत आहे. कोणीच शेतकऱ्यांची दखल घेत नाही.  पूर्वी गाईच्या दुधाचा ३० ते ३२ रुपयांपर्यंत असणारा दर आता १८ ते २० रुपयांवर खाली आला आहे. तर म्हशीच्या दुधासाठी ३२ रुपयांपर्यंत दर मिळतो आहे. फॅट कमी निघाल्यास त्यापेक्षाही आणखी दर कमी होतो. एकीकडे ही परिस्थिती असताना, दुभत्या जनावरांना जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. किमान एका गाईला दिवसाला २ ते ४ किलो ओला आणि सुका चारा लागतो. तसेच तेवढेच पशुखाद्य लागते. या संपूर्ण खर्चाचा मेळ बसवण्यासाठी नुसती कसरत सुरू आहे.  बाजारातील पशुखाद्याचे दर  सुग्रास पोते (५० किलो) १२०० ते १४०० रुपये, खापरी पेंड (५० किलो) २२०० ते २४००, मका भरडा (५० किलो) ८०० ते ९०० रुपये असे दर आहेत. गेल्या दोन वर्षात तर पशुखाद्याचे दर आणखीनच वाढले आहेत. ओला, सुका चारा असतोच, पण दूधवाढीसाठी पशुखाद्यही आवश्यकच असते. त्यामुळे महाग असले, तरी ते शेतकऱ्यांना घ्यावेच लागते.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT