संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील दूध वाहतुकीसाठी रेल्वेत हवी स्वतंत्र व्यवस्था

टीम अॅग्रोवन

भंडारा   ः रेल्वेच्या माध्यमातून नागपूर येथे दूध नेणाऱ्या भंडारा, गोंदिया जिल्ह्यांतील दुग्ध व्यावसायिकांसाठी स्वतंत्र डबा (बोगी) मिळावा, अशी मागणी आहे. या संदर्भाने माजी खासदार शिशुपाल पटले यांना निवेदन देण्यात आले. 

भंडारा, गोंदिया जिल्ह्यात ५०० पेक्षा अधिक शेतकरी दुग्ध व्यवसाय करीत आहेत. दोन लाख लिटरपेक्षा अधिक दुधाचे संकलन या दोन जिल्ह्यांत होते. येथील शेतकऱ्यांच्या मुलांनी नोकरीच्या मागे न लागता स्वयंरोजगारासाठी हा पर्याय निवडला आहे.  या दोन्ही जिल्ह्यांतून नागपूरला दुधाचा पुरवठा होतो. दुधाच्या वाहतुकीसाठी रस्त्याऐवजी रेल्वेचा पर्याय फायदेशीर ठरतो. त्याची दखल घेत २००५ मध्ये माजी खासदार शिशुपाल पटले यांच्या पाठपुराव्यामुळे महाराष्ट्र एक्‍स्प्रेसला दूध वाहतुकीसाठी स्वतंत्र डबा जोडण्यात आला होता. या माध्यमातून दूध पुरवठादारांची चांगली सोय झाली होती.

मधल्या काळात हा डबा बंद करण्यात आल्यानंतर शिशुपाल पटले यांनी रेल्वे प्रशासनातील अधिकाऱ्यांची भेट घेत तो डबा पुन्हा जोडण्यास सांगितले होते. त्यानंतर पुन्हा डबा जोडला गेला. आता दूध पुरवठादार शेतकऱ्यांची संख्या वाढल्याने अतिरिक्‍त दोन डबे दूध वाहतुकीकरिता उपलब्ध व्हावेत, अशी मागणी आहे. 

या आश्‍वासनाची पूर्तता लवकर करणार असल्याचे शिशुपाल पटले यांनी सांगितले. त्याकरिता रेल्वे व्यवस्थापक व रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना भेटणार असल्याची माहिती त्यांनी दूध उत्पादकांना दिली. या मागणीच्या पूर्ततेकडे दूध विक्रेत्यांचे लक्ष्य लागले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT