दूध भुकटी उद्योग संकटात ; शेतकऱ्यांना वाढीव दराची प्रतीक्षाच
दूध भुकटी उद्योग संकटात ; शेतकऱ्यांना वाढीव दराची प्रतीक्षाच 
मुख्य बातम्या

दूध भुकटी उद्योग संकटात ; शेतकऱ्यांना वाढीव दराची प्रतीक्षाच

तात्या लांडगे

सोलापूर : दूध व दुग्धजन्य पदार्थांची देशांतर्गत गरज भागवून शिल्लक दुधापासून भुकटी बनविली जाते. परंतु, सद्यःस्थितीत महाराष्ट्रात 30 हजार टन तर देशात दोन लाख टन अतिरिक्‍त भुकटी विक्रीविना पडून असल्याचे दुग्ध विभागाकडून सांगण्यात आले. भुकटी निर्मितीची स्थिती नाकापेक्षा मोती जड अशी झाली आहे. भुकटी निर्मितीसाठी 200 रुपयांचा खर्च अन्‌ जागतिक बाजारात भुकटीचा दर 120 रुपये प्रतिकिलो आहे. त्यामुळे भुकटी उद्योग अडचणीत आला असून शेतकऱ्यांना वाढीव दराची अद्यापही प्रतीक्षाच करावी लागत असल्याचे राज्यभरात चित्र पाहायला मिळत आहे. जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश असलेल्या भारतात मागील चार वर्षांपासून दरवर्षी दूध उत्पादनात सरासरी पाच ते सहा टक्‍के वाढ होत आहे. महाराष्ट्र राज्यात सध्या एक कोटी 32 लाख लिटर दुधाचे संकलन असून त्यातील सुमारे 40 लाख लिटर दूध शिल्लक राहते. 

आकडे बोलतात... 

  • देशाचे दूध उत्पादन :  176.35 दशलक्ष टन 
  • महाराष्ट्राचे दूध उत्पादन  : 1.32 कोटी लिटर 
  • देशातील शिल्लक भुकटी : 2.03 लाख टन 
  • महाराष्ट्रातील अतिरिक्‍त भुकटी : 30,349 मे.टन 
  • भुकटी निर्मितीचा दर (प्रतिकिलो) : 190-200 रुपये 
  • जागतिक बाजारातील दर :  120 रुपये
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Kolhapur River Pollution : पंचगंगा जलपर्णीच्या विळख्यात, गढूळ पाण्याचा दुर्गंध, प्रदुषण नियंत्रण मंडळ करतय काय?

    Village Development : शेती प्रयोगशीलता अन ग्रामविकास...

    Panchayat Development Index : पंचायत विकास निर्देशांक

    Vegetable Market : कडक उन्हाचा पालेभाज्यांवर परिणाम, मार्केटमध्ये आंबेच आंबे

    Agriculture Import : आयातीत कसली आत्मनिर्भरता?

    SCROLL FOR NEXT