दूध दर पाडणाऱ्या दूध  संघ, कंपन्यांचे ऑडिट करा ः किसान सभा  Milk that lowers the rate of milk Sangh, audit companies: Kisan Sabha
दूध दर पाडणाऱ्या दूध  संघ, कंपन्यांचे ऑडिट करा ः किसान सभा  Milk that lowers the rate of milk Sangh, audit companies: Kisan Sabha 
मुख्य बातम्या

दूध दर पाडणाऱ्या दूध  संघ, कंपन्यांचे ऑडिट करा ः किसान सभा 

टीम अॅग्रोवन

नगर : लॉकडाउनचा गैरफायदा घेत खासगी दूध कंपन्या व सहकारी दूध संघांनी दूध खरेदीचे दर प्रति लिटर १० ते १८ रुपयांनी पाडले आहेत. मात्र फार अतिरिक्त दूध आहे, अशी अजिबात परिस्थिती नाही. त्यामुळे राज्य सरकारने या लुटमारीची तातडीने दखल घ्यावी. सर्व खासगी दूध कंपन्या व सहकारी दूध संघाचे लॉकडाउन काळात दूध खरेदी व विक्रीचे ऑडिट करावे. कंपन्यांनी प्रत्यक्षात, या काळात किती दूध काय दराने खरेदी केले व किती दराने विकले याची वस्तुनिष्ठ आकडेवारी राज्य सरकारने प्राप्त करून घ्यावी व या आधारे नक्की राज्यात किती दूध अतिरिक्त ठरले होते व त्यासाठी किती भाव कमी करणे अपेक्षित होते, या बाबत सखोल चौकशी करावी, अशी मागणी किसान सभेने केली आहे.  किसान सभेचे नेते डॉ. अशोक ढवळे, जे. पी. गावित, किसन गुजर, डॉ. अजित नवले यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी मागणी केली आहे, ‘‘राज्यात लॉकडाउन पूर्वी शेतकऱ्यांना प्रती लिटर दुधासाठी ३० ते ३८ रुपये दर मिळत होता. लॉकडाउन जाहीर होताच टप्प्याटप्प्याने हे दर संघटितरीत्या पाडण्यात आले असून, ते २० ते २२ रुपये प्रति लिटर वर आणण्यात आले आहेत. खासगी दूध कंपन्या व सहकारी दूध संघांनी संघटितरीत्या लॉकडाउनचा बाऊ करून हे दर पाडले असून, यातून अमाप नफा कमविला आहे. राज्यात प्रतिदिन १ कोटी ३० लाख लिटर दुधाचे संकलन होते. पैकी ४० लाख लिटर दूध पावडर बनवण्यासाठी प्रक्रिया उद्योगात वापरले जाते. उर्वरित ९० लाख लिटर दूध, पाउच पॅकिंगद्वारे घरगुती वापरासाठी वितरित होते. शहरांमध्ये हॉटेल व चहाची दुकाने बंद असल्याने काही प्रमाणात दुधाची मागणी घटली आहे, मात्र घरगुती दुधाचा वापर बिलकूल कमी झालेला नाही. ३० ते ४० टक्के दूध अतिरिक्त ठरावे, अशी बिलकूल परिस्थिती नाही. प्रति लिटर दुधाचे दर १० ते १८ रुपयाने पाडावे, अशी कोणतीच आणीबाणी दूध क्षेत्रात निर्माण झालेली नाही. असे असताना मागणी घटल्याने दुधाचा महापूर आला, अशी अत्यंत चुकीची आवई उठवून दूध कंपन्यांनी शेतकऱ्यांना लुटले आहे. अवास्तव दर पाडणाऱ्यांवर या माध्यमातून कठोर कारवाई करावी. शेतकऱ्यांची या माध्यमातून कंपन्या व दुध संघांनी केलेली लूट वसूल करून शेतकऱ्यांना परत करावी. लूटमार होऊ नये यासाठी खासगी व सहकारी दूध संस्थांना लागू असेल, असा लूटमार विरोधी कायदा करावा, दुधातील भेसळीवर कठोर निर्बंध आणणाऱ्या उपाययोजना कराव्यात, तसेच अनिष्ट ब्रँड वॉर व लूटमार रोखण्यासाठी राज्यात एक राज्य एक ब्रॅंडचे धोरण राबवावे.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Vaccination : पावसाळ्यापूर्वी जनावरांचे लसीकरण करा

Summer Sowing : दुष्काळी छायेतही २४ हजार हेक्टरवर पेरा

Summer Sowing : यवतमाळच्या शेतकऱ्यांची उन्हाळी तिळाला पसंती

Onion Export Policy : अस्थिर कांदा धोरणांचे उमटणार राजकीय पडसाद

Onion Export : कांदा निर्यात खुली; मात्र अटी, शर्थींचा खोडा

SCROLL FOR NEXT